'पिल्लांच्या पंखांत...' श्रीजयासाठी अशोक चव्हाणांची भावूक पोस्ट, राजकारणात एन्ट्रीचे संकेत
By श्रीनिवास भोसले | Published: November 8, 2022 08:20 PM2022-11-08T20:20:20+5:302022-11-08T20:32:41+5:30
श्रीजया चव्हाण या काँग्रेसच्या आयटी सेलची जबाबदारी सांभाळतात. त्यांच्या नेतृत्वाखालीच नांदेडच्या बहुतांश निवडणूकांमध्ये आयटी सेल कार्यरत राहीला आहे.
नांदेड: माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा राजकीय वारस कोण, अशा चर्चा अनेकवेळा होतात. त्यात तर्कविर्तकही काढले जातात. परंतु, भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने लागलेल्या बॅनरवर अशोकराव यांची कन्या श्रीजया यांचे फोटो आमदारांच्या रांगेत लागले आहे. त्यामुळे आगामी काळातील त्यांची राजकारणातील एन्ट्री फिक्स मानली जात आहे.
काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारीपासून भारत जोडो यात्रा निघाली आहे. त्याची काँग्रेसच्यावतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. देगलूर येथून सदर पदयात्रा महाराष्ट्रात मार्गक्रमण करणार आहे. त्यानिमित्ताने देगलूर ते अर्धापूरपर्यंतच्या मार्गावर लागलेल्या बॅनरवर श्रीजयाचे फोटो ठळकपणे लावले आहेत. यापूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणात कधीही श्रीजया अथवा अशोकराव चव्हाण यांच्या दुसरी कन्या सुजयाचेही कधी फोटो लागले होते. त्यात वृत्तमानत्रातील जाहिरातींमध्येही श्रीजया यांचे फोटो अशोकराव चव्हाण यांच्या बरोबरीने ठळकपणे दर्शवून एकप्रकारे चव्हाणांची राजकीय वारसदार म्हणून श्रीजयाला पुढे केले जात असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.
श्रीजया भारत जोडोमध्ये सक्रीय
श्रीजया चव्हाण या काँग्रेसच्या आयटी सेलची जबाबदारी सांभाळतात. त्यांच्या नेतृत्वाखालीच नांदेडच्या बहुतांश निवडणूकांमध्ये आयटी सेल कार्यरत राहीला आहे. त्यामुळे त्यांचा नांदेडच्या राजकारणातील अभ्यासही चांगला आहे. दरम्यान, त्यानी भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांच्या सोबत सहभागी झाल्या.
वडील असलेल्या अशोक चव्हाण यांची भावनिक पोस्ट
दरम्यान, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी वडील या नात्याने कन्या श्रीजया हिच्या संदर्भात सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट टाकत एक प्रकारे त्यांची राजकीय वारसदार म्हणून श्रीजया ला पुढे केले असेच मानावे लागेल.
पिल्लांच्या पंखांत जेव्हा बळ येतं,
त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होतो,
आणि आभाळात झेप घेण्यासाठी
जेव्हा ती सज्ज होऊ लागतात,
तेव्हा पाखरांना होणारा आनंद
अवर्णनीय असाच रहात असणार