माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना ६८,००० मतांची निर्णायक विजयी आघाडी मिळाली आहे. महाराष्ट्राला मुख्यमंत्री देणारा आणि काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून भोकर मतदारसंघाची जुनी ओळख आहे. प्रारंभी १९६२, १९६७, १९७२, १९७८ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शंकरराव चव्हाण यांनी विजय मिळवित सतत २० वर्षे नेतृत्व केले होते. त्यानंतर सातत्याने हा मतदार संघ चव्हाण कुटुंबियांच्या पाठीशी राहिला आहे़ २०१४ मध्ये अमिता चव्हाण यांनी मतदारसंघाचे नेतृत्व केले होते़ त्यानंतर यावेळी खुद्द अशोकराव चव्हाण हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत़ त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीतून भाजपात आलेले बापूसाहेब गोरठेकर यांना उमेदवारी देवून ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.
विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून भोकर मतदारसंघात १६ व्या फेरीनंतर अशोक चव्हाण यांनी निर्णायक विजयी आघाडी घेतली आहे.
भोकर मतदारसंघात १९७८ मध्ये चव्हाण आणि गोरठेकर आमनेसामने आले होते. फरक एवढाच की, आता त्यांच्या वारसांमध्ये लढत होत आहे. तर वंचितही येथे रिंगणात आहे़ या मतदार संघावर आतापर्यंत काँग्रेसचेच वर्चस्व राहिले असून चव्हाण कुटुंबियांचा पारंपरिक मतदारसंघ म्हणूनही भोकरची ओळख आहे़ वंचित बहुजन आघाडीने नामदेव आयलवाड तर बसपाने रत्नाकर तारु यांना उमेदवारी दिली आहे़
असे होते २०१४ चे चित्र : अमिता चव्हाण (काँग्रेस-विजयी) माधवराव किन्हाळकर (भाजप-पराभूत)