नेरली एकताच्या ताब्यात
नांदेड : शहरालगत असलेल्या नेरली ग्रामपंचायतीवर महाविकास एकता पॅनलने झेंडा फडकविला. पॅनलप्रमुख शेख मिनाज यांच्या नेतृत्त्वाखाली ही निवडणूक लढवण्यात आली. या निवडणुकीत शेख मिनाज, शेख जावेद, मालनबी शेख उमर, रमेश रासे, वैशाली कोकरे, इंदिराबाई राऊत, शिवकांता रासे, राजू नरवाडे आदी निवडून आले आहेत.
डिजीटल कार्यशाळा
भोकर : प्रधानमंत्री आत्मनिर्भर निधी पथविक्रेत्यांसाठी सूक्ष्म पतपुरवठा सुविधा योजनेअंतर्गत कर्ज प्राप्त १६ लाभार्थ्यांसाठी कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी सहाय्यक प्रकल्प अधिकारी सुनील कल्याणकर यांनी मार्गदर्शन केेले. याप्रसंगी सहाय्यक व्यवस्थापक विकास पासवान, एस. जे. धवराल, अनिल नरवाडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी बालाजी चावरे, साहेबराव मोरे, संतोष पांचाळ, अशोक डोंगरे, दत्ता अनंतवाड, श्रीधर कदम, मंगेश व्यवहारे, नारायण आंदेवाड, देवतळे, देशमुख, मुक्तार आदींनी परिश्रम घेतले.
दिव्यांगांना प्रमाणपत्र
किनवट : अखिल भारतीय दिव्यांग कामगार संघटनेच्या वतीने किनवट - माहूर तालुक्यातील ११० दिव्यांग लाभार्थ्यांना ऑनलाईन प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यावेळी तालुकाप्रमुख बालाजी मुरकुटे, सुरेश घुम्मडवाड, सुनील गरड, राज माहूरकर, गजानन कोतपेल्लीवार, अनिल दोराटे, सलाम बागवान, संतोष खाडे आदी उपस्थित होते.
पत्रकारांचा सत्कार
कुंडलवाडी : दर्पण दिनानिमित्त स्थानिक पत्रकारांचा पालिकेच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला नगराध्यक्षा सुरेखा जिठ्ठावार, माजी नगराध्यक्ष भूमन्ना ठक्कुरवाड, नरसिंग जिठ्ठावार, माजी नगराध्यक्ष डॉ. सायन्ना शेंगुलवार यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन कुणाल पवार यांनी केले.
राजीनाम्याची मागणी
बिलोली : मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी बिलोली तालुका भाजप महिला मोर्चाच्या वतीने करण्यात आली. मुंडे यांच्या विरोधात तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात शिवकन्या सुरकुलावार, संगीता मेरगेवाड, अश्विनी इंगळे, हेमा चौधरी, सीमा मॅकलोड, सुलोचना स्वामी आदींनी सहभाग नोंदविला.
आरक्षणाकडे लक्ष
हदगाव : ग्रामपंचायत निवडणुकीनंतर आता सर्व उमेदवारांचे सरपंच पदाच्या आरक्षणाकडे लक्ष लागले आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर संबंधित आरक्षण प्रवर्गातील उमेदवार नसेल तर पॅनलप्रमुखांची गोची होणार आहे. परिणामी भल्याभल्यांच्या तोंडचे पाणी पळणार आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष सरपंच आरक्षणाकडे लागले आहे.
भाजपचा सफाया
नायगाव : एका जागेसाठी फेरमतदान झालेल्या खैरगाव ग्रामपंचायतीमधून भाजपचा सफाया झाला आहे. माजी आमदार वसंतराव चव्हाण गटाचे वसंतराव जाधव, माधव शिंपाळे व दाजीराव पाटील यांच्या गटाने ९पैकी ७ जागा मिळविल्या. मागील पाच वर्षात ग्रामपंचायतीवर भाजपच्या कुमुद पटेल यांची सत्ता होती.