नांदेड : पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रयत्नातून जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त होत आहे. मुदखेड तालुक्यातील मंजूर झालेल्या विविध विकासकामांचे भूमिपूजन विधानपरिषदेचे प्रतोद आमदार अमरनाथ राजूरकर यांच्या हस्ते करण्यात आले.
गोदावरी नदीवर आमदुरा येथे ५० लाख रुपये खर्च करून गोदावरी नदीवर घाट बांधण्यात येणार आहे. त्यासोबतच आमदुरा - चिकाळा - डोणगाव - कोल्हा रस्त्यावरील चिकाळा तांडाजवळील रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यासाठी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या दोन्ही कामांचे भूमिपूजन आमदार राजूरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अरुणा कल्याणे, माजी जिल्हा परिषद सदस्य रोहिदास जाधव, भीमराव कल्याणे, तालुकाध्यक्ष उद्धव पवार, पिंटू पाटील-वासरीकर, मुदखेडचे नगरसेवक माधव कदम, उत्तम चव्हाण, मारोती किरकण, विनोद चव्हाण, साहेबराव गोरखवाड, पंडित चव्हाण, रोहित तोंडले, कार्यकारी अभियंता कोरे, उपकार्यकारी अभियंता बालाजी पाटील, शाखा अभियंता टी. व्ही. पिनगाळे आदी उपस्थित होते.