नांदेड : संत नामदेव महाराज यांच्या विचारांचा वारसा घेऊन सुरू झालेली नानकसाई फाऊंडेशनची घुमान यात्रा पंजाब आणि महाराष्ट्रासाठी भूषणावह असून या दोन राज्यांत सेतु म्हणून ही चळवळ उभी टाकली आहे, असे प्रतिपादन लंगर साहिब गुरूद्वाराचे प्रमुख संतबाबा नरेंद्रसिंघजी यांनी केले.घुमान यात्रेची धन्यवाद सभा नांदेडभूषण संतबाबा नरेंद्रसिंघजी यांच्या अध्यक्षतेखाली लंगर साहिब येथे गुरूनानक निवासमध्ये झाली. त्यावेळी ते बोलत होते.संतबाबा नरेंद्रसिंघजी म्हणाले, संत शिरोमणी भक्त नामदेव महाराज यांनी एकच धर्म मानला तो म्हणजे मानवता. त्यांनी सातशे वर्षांपूर्वी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन उत्तर भारतात बंधुभाव जागृत केला असल्याचे संतबाबा नरेंद्रसिंघ यांनी सांगितले़ ते म्हणाले, त्यांच्याच विचारांचा प्रचार- प्रसार करत पंजाब आणि महाराष्ट्रात सांस्कृतिक देवाण घेवाण करून दोन राज्यांना जोडण्याचे महान कार्य घुमान यात्रा करत आहे. ही बाब दोन्ही प्रांतांसाठी भूषणावह आहे.प्रारंभी नानकसाई फाऊंडेशनचे चेअरमन पंढरीनाथ बोकारे यांनी प्रास्ताविक केले़ तसेच घुमान यात्रेच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केल्याबद्दल संत बाबा नरेंद्रसिंघ जी आणि संतबाबा बलविंदरसिंघजी यांचे धन्यवाद व्यक्त केले. घुमान यात्रा दोन राज्यांतील लोकचळवळ व्हावी असा आमचा मानस असून ११ हजार मराठी जणांना पंजाबदर्शन घडविण्यात येणार असल्याचे बोकारे यांनी सांगितले.याप्रसंगी अॅड.डी. पी. मनाठकर, शिवसेनेचे समन्वयक धोंडू पाटील, प्रा. दीपक कासराळीकर, केरबा जाधव, तुकाराम कोटूरवार, सुनीता कांबळे, जी़ नागय्या यांनी आपले अनुभवकथन केले. घुमान यात्रा जीवनातील एक अविस्मरणीय क्षण असा उल्लेख मान्यवरांनी व्यक्त केले. पाचव्या घुमान यात्रेत सहभागी झालेल्या सर्व यात्रेकरूंचा संतबाबा नरेंद्रसिंघजी यांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला.यावेळी नारायणराव मंजुवाले, सतीश देशमुख तरोडेकर, सुहास देशमुख लहानकर, अॅड. विजय भोपी, अॅड. बी. आर. भोसले, अॅड. व्ही. ए. नांदेडकर, अॅड व्ही. जी. बचाटे, सुधाकर पिलगुंडे, माधवराव पटणे, प्रफुल्ला बोकारे, उत्तमराव पाटील बाचेगावकर, प्रा. गजानन देवकर, गंगाधर पांचाळ, शंकरराव परकंठे, धोंडोपंत विष्णूपुरीकर, पुंडलिक बेलकर, बालाजीराव ढगे, बालाजी शेळके, देवराव चिंचोलकर, डी. जे. कु-हाडे, अनिल कठाळे, धुंडिराज मुस्तापुरे, अॅड. जीवनराव चव्हाण, पांडुरंगराव गोरठेकर, राजेंद्र देसले, रंगनाथ ढवळे, सुनीता माळवदे, के.डी. देशमुख, प्रकाश दळवे, माणिकराव वंगलवार, हिरामण पाटील, प्रकाश कांबळे, रामदास वलकटी, प्राचार्य प्रभाकर उदगिरे, रावसाहेब सानप, व्यंकटेश हसनपल्ली, अॅड़ शरद अडसूळ, अॅड. संजय देशमुख, उदय चौधरी, विठ्ठलराव दावेवार, महेंद्र सावंत, ब्रह्मानंद गंजी उपस्थित होते़
‘घुमान यात्रा’ पंजाब अन् महाराष्ट्रासाठी भूषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2018 12:00 AM
संत नामदेव महाराज यांच्या विचारांचा वारसा घेऊन सुरू झालेली नानकसाई फाऊंडेशनची घुमान यात्रा पंजाब आणि महाराष्ट्रासाठी भूषणावह असून या दोन राज्यांत सेतु म्हणून ही चळवळ उभी टाकली आहे, असे प्रतिपादन लंगर साहिब गुरूद्वाराचे प्रमुख संतबाबा नरेंद्रसिंघजी यांनी केले.
ठळक मुद्देनरेंद्रसिंघजी यांचे प्रतिपादनघुमान यात्रेची धन्यवाद सभा