गौरी प्रमोदसिंह ठाकूर यांनी आकाश एजन्सीज़ स्नेहनगर पोलीस कॉलनी यांच्याकडून नवीन सायकल खरेदी केली होती. ही सायकल कोविड प्रादुर्भावामुळे अतिशय कमी चालवूनसुद्धा एका वर्षाच्या आतच सायकलची बॉडी (चेचीस) गंजून तुटली. या प्रकारामुळे एखादा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाल्याने ही बाब आकाश एजन्सी यांना कळविली असता, दुकानदाराने यास मी जबाबदार नाही. तसेच कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई देणार नाही. तुम्हाला काय करायचे ते करा, असे उत्तर दिले. त्यामुळे ठाकूर यांनी आकाश एजन्सीच्या विरुद्ध जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग नांदेड यांच्याकडे याचिका दाखल केली. न्यायमंचाने दोन्ही पक्षकारांचे म्हणणे ऐकून घेऊन ग्राहकाची तक्रार पूर्णत मंजूर केली. आकाश एजन्सीला सायकलची किमत ५,६५० रुपये आदेश तारखेपासून ३० दिवसांच्या आत द्यावेत. पैसे मुदतीत न दिल्यास दर साल दर शेकडा ९ टक्के व्याज दराने रक्कम अदा करेपर्यत देय राहील. तसेच एजन्सीने ग्राहकास नुकसान भरपाई म्हणून पाच हजार रुपये आदेश तारखेपासून ३० दिवसांच्या आत द्यावेत. तसेच ग्राहकास मानसिक त्रासापोटी दोन हजार रुपये व दावा खर्च म्हणून दोन हजार रुपये देण्याचे आदेश दिले.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडून सायकल दुकानदारास दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 4:18 AM