मुखेड तालुक्यातील बार्हाळी शिवारात शेतात बांधलेली एक म्हैस आणि दोन बैल चोरट्याने सोडून नेले. ही घटना ११ मार्च रोजी घडली. प्रकाश शिवलिंगअप्पा गवाणे यांनी शेतात म्हैस आणि बैल बांधून ठेवले होते. १ लाख ६० हजार रुपयांची ही जनावरे लांबविण्यात आली. या प्रकरणात मुक्रमाबाद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
विभाग नियंत्रकाला केली शिवीगाळ
शहरातील वर्कशॉप भागात असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या कार्यालयात विभागीय नियंत्रकाला शिवीगाळ करण्यात आली. ही घटना २२ मार्च रोजी घडली. अशोक रामकिशन पन्हाळकर हे कार्यालयात असताना दोन आरोपी त्या ठिकाणी आला. रजेचे देयक न मिळाल्याने त्यांनी पन्हाळकर यांच्याशी वाद घालून शिवीगाळ केली. या प्रकरणात शासकीय कामात अडथळा केल्यावरुन भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
गोमांस विक्री करताना पकडले
लोहा तालुक्यातील माळाकोळी येथे एका पडक्या वाड्यात गोमांस विक्री करताना पोलिसांनी एकाला पकडले. २२ मार्च रोजी ही कारवाई करण्यात आली. आरोपीजवळ पाच ते सहा किलो गोमांस होते. या प्रकरणात पोकॉ.विनोद भूरे यांच्या तक्रारीवरुन माळाकोळी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दुचाकीच्या हप्त्यासाठी विवाहितेचा छळ
दुचाकीचा हप्ता भरण्यासाठी माहेराहून ५० हजार रुपये घेवून येण्याच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ करण्यात आला. ही घटना माहूर तालुक्यातील मोहपूर येथे घडली. पैशाची मागणी पूर्ण होत नसल्याने सासरच्या मंडळींनी पीडितेला मारहाण केली. या प्रकरणात माहूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोहेकॉ.जाधव हे करीत आहेत.
एकलारा येथे जुगार अड्डयावर धाड
मुखेड तालुक्यातील मौजे एकलारा येथे दुकानासमोर सुरु असलेल्या जुगार अड्डयावर पोलिसांनी धाड मारली. २२ मार्च रोजी ही कारवाई करण्यात आली. या ठिकाणी टाईम बाजार नावाचा मटका सुरु होता. यावेळी सव्वा तीन हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणात मुखेड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.