नांदेड शहर वाहतूक शाखेने कोरोनाच्या पूर्वी विशेष मोहीम हाती घेत भाग्यनगर, आनंदनगर, बाबानगर, वजिराबाद, मोंढा परिसरात स्टंट करणाऱ्या दुचाकीस्वारांच्या गाड्या जप्त करून कारवाई केली होती.
रात्री उशिरा भाग्यनगर, बाबानगरात स्टंटबाजी
शहरातील भाग्यनगर, बाबानगर, विद्युतनगर, आनंदनगर, श्रीनगर या परिसरात विद्यार्थ्यांचे वास्तव्य आहे.
महाविद्यालये, शिकवणी अधिक असल्याने या भागात रात्री उशिरा जाेराने दुचाकी चालवून आवाज करणे, एका टायरवर दुचाकी घेणे.
भाग्यनगर ते आनंदनगर या रस्त्यावर एका टायरवर गाडी घेऊन स्टंट केला जातो.
अशा प्रकारचा स्टंट करणारे अनेक वेळा पडतात. एकाच टायरवर दुचाकी पळविणे जीवावरही बेतू शकते.
कारवाई सुरूच
सध्या शाळा, महाविद्यालये बंद असल्याने त्या परिसरात कारवाई दिसत नाही. परंतु, कारवाई सुरूच आहे. शहरातील स्टंटबाजांचे प्रमाण खूप कमी झाले आहे.
- चंद्रशेखर कदम, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा, नांदेड शहर
शहरातील वर्दळीच्या ठिकाणी स्टंट करणाऱ्या तसेच जोराने वाहने चालविणाऱ्यांना पोलिसांनी दंड केला. या कारवाईत अनेकांची वाहने जप्त करण्यात आली. त्यांना दंड भरून आपली वाहने सोडवून न्यावी लागतात. स्टंटबाजांना लगाम घालण्यासाठी त्यांची गाडी त्यांच्या नाही तर पालकांच्या ताब्यात देण्याचा फंड वाहतूक निरीक्षक चंद्रशेखर कदम यांनी राबविला होता.