नांदेड- लोहा-लातूर रस्त्यावर आयटीआय परिसरातून चोरट्याने स्विफ्ट कारची बॅटरी लंपास केली. बालाजी मारोती सरोदे यांनी एम.एच.२६, बीएच.७९६४ या क्रमांकाची कार उभी केली होती. या कारधमून सहाहजार रुपये किमतीची बॅटरी लांबविण्यात आली. या प्रकरणात लोहा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
मुलीच्या सासरच्यांनी पित्याला केली मारहाण
नांदेड- मुलगी आणि जावयाचे पटत नसल्याने माहेरी राहायला आलेल्या मुलीचे कपडे आणि इतर साहित्य आणण्यासाठी तिच्या सासरी गेलेला पिता आणि मावशीला बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना माहूर तालुक्यातील मौजे लांजी येथे घडली.
सुनिल खिमा जाधव यांची मुलगी अंजली हिचे लांजी येथील कालीदास यांच्याशी लग्न झाले होते. परंतु दोघांचे पटत नसल्याने मुलगी माहेरी राहण्यासाठी आली होती. त्यानंतर जाधव आणि मुलीची मावशी हे मुलीचे कपडे आणि इतर साहित्य आणण्यासाठी लांजी येथे गेले होते. यावेळी सासरच्या मंडळींनी त्यांना शिवीगाळ केली. यावेळी जाधव यांनी मुलीला का मारहाण करता असा जाब विचारला. त्यानंतर त्यांच्यावर कुर्हाडीने हल्ला करण्यात आला. या प्रकरणात माहूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. या प्रकरणाचा तपास पोहेकॉ.राठोड हे करीत आहेत.
ऑनलाईन लॉटरी खेळताना पकडले
नांदेड- धर्माबाद शहरात एका शटरमध्ये सुरु असलेल्या ऑनलाईन लॉटरीवर पोलिसांनी धाड मारली. यावेळी तीन हजार रुपये जप्त करण्यात आले.१५ जानेवारी रोजी ही कारवाई करण्यात आली.बुर्हाणशहा चौक भागात एका शटरमध्ये ही लॉटरी सुरु होती. या प्रकरणात पोहेकॉ.मनाेज मसलेकर यांच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंद झाला.
दहा हजार रुपयांची दारु पकडली
नांदेड- कंधार तालुक्यातील दिग्रस येथे विनापरवाना विक्री करण्यासाठी बाळगलेली दहा हजार रुपयांची देशी दारु पोलिसांनी जप्त केली आहे.१४ जानेवारी रोजी ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात पोकॉ.बालाजी केंद्रे यांच्या तक्रारीवरुन कंधार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.