कार्यक्रमाचे अध्यक्ष डी. पी. सावंत म्हणाले की, आबासाहेब लहानकर यांचे कार्य युवा पिढीला प्रेरणा देणारे आहे. त्यांच्या कार्याच्या जडणघडणीबद्दल निजाम यांच्या विरूद्ध लढलेल्या कार्याचा उल्लेख करून लहानकर यांनी स्वातंत्र्य लढ्यासाठी आणि देशसेवेसाठी आपले आयुष्य अर्पण केले. त्यांच्या स्वातंत्र्य संग्राम काळातील आठवणींना उजाळा देण्यासाठी एक साहित्य पुस्तिका बनवून त्याचे लवकरच विमोचन करू.
प्रास्ताविक विजय येवनकर यांनी केले. यावेळी प्रा. एम. यू. धावंडेकर, श्रीराम पिंपळगावकर, वसंतराव सर्जे, एस. एस. शर्मा, डॉ. दिलीप धानोरकर, डॉ. आबासाहेब निळकंठे, बी. डी. सोळुंके, ईश्वर मोंढे, माधवराव मोरे, दीपकराव चव्हाण, अनंतराव गाडेगावकर, विजय कच्छवा, पी. एम. रेड्डी, संतोष टाकणकर, संघरत्न कांबळे, अमित वाघ, बाबुराव तांबोळी, आब्बासभाई, नंदू चौधरी, केशर पवार, विजय गोडबोले, दिगंबरराव खानसोळे, सुहास लहानकर आदी उपस्थित होते.