शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
2
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
3
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
4
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
5
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
6
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
7
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
8
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
9
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
10
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
11
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
12
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
13
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
14
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
15
भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
16
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
17
'अबीर गुलाल'नंतर नुकतीच सुरु झालेली कलर्स मराठीवरील नवी मालिका होणार बंद? चाहत्यांना धक्का
18
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
19
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
20
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश

भाजप सरकार फसवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 12:05 AM

राज्यासह देशातील बेरोजगारी, असहिष्णुता, महिलांवरील अत्याचार, शेतक-यांच्या प्रश्नासंदर्भात सरकारच्या उदासीन भूमिकेमुळे सर्वसामान्यांच्या मनात अस्वस्थता आहे. पिण्याच्या पाण्याचे, उद्योग व शेतीच्या पाण्याचे भाव वाढविले. शेतक-यांच्या कर्जमाफीची घोषणा फसवी निघाली, वीज कनेक्शन तोडणे, शेती सिंचनासाठी आवश्यक सामग्रीच्या किमतीत वाढ यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शेतकरी हा राज्याच्या, देशाचा कणा आहे. मात्र हे सरकार कणाच मोडायला निघाले आहे, असा हल्लाबोल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.

ठळक मुद्दे अजित पवार यांचा घणाघातलोहा येथे हल्लाबोल मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कलोहा: राज्यासह देशातील बेरोजगारी, असहिष्णुता, महिलांवरील अत्याचार, शेतक-यांच्या प्रश्नासंदर्भात सरकारच्या उदासीन भूमिकेमुळे सर्वसामान्यांच्या मनात अस्वस्थता आहे. पिण्याच्या पाण्याचे, उद्योग व शेतीच्या पाण्याचे भाव वाढविले. शेतक-यांच्या कर्जमाफीची घोषणा फसवी निघाली, वीज कनेक्शन तोडणे, शेती सिंचनासाठी आवश्यक सामग्रीच्या किमतीत वाढ यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शेतकरी हा राज्याच्या, देशाचा कणा आहे. मात्र हे सरकार कणाच मोडायला निघाले आहे, असा हल्लाबोल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.लोहा येथील बैल बाजार मैदानात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शनिवारी हल्लाबोल मेळावा घेण्यात आला़ याप्रसंगी अजित पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आ. शंकरअण्णा धोंडगे तर प्रमुख पाहुणे म्हणून विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, पक्ष प्रवक्ते नवाब मलीक, चित्राताई वाघ, कमलकिशोर कदम, संग्राम कोते, आ.सतीश चव्हाण, आ. विक्रम काळे, कल्पना पाटील डोंगळीकर, प्रांजली रावणगावकर, बसवराज पाटील, वसंत सुगावे, हरिहर भोसीकर, जिल्हाध्यक्ष डॉ़ सुनील कदम, दिलीप धोंडगे, संजय क-हाळे, बाबूराव केंद्रे, आदींची उपस्थिती होती.अजित पवार म्हणाले, आघाडी सरकारच्या काळात लोहा-कंधार मतदारसंघात विविध धरणे, बॅरेजेस, तलावाला कुठलाही भेदभाव न ठेवता भरभरुन देण्यात आले़ पाण्यामुळे मराठवाडा सुजलाम् सुफलाम् होईल, नदीकाठची गावे हिरवीगार होऊन शेतकरी सुखी होईल. परंतु आजचे सरकार शेतकºयांचे वीज कनेक्शन तोडत आहे.शेतकºयांचे पीक कर्ज माफ करण्याची घोषणा केली तीही फसवी, साडेतीन वर्षांत एकाही बेरोजगाराला नोकरी दिली नाही. मागासवर्गीय, आदिवासी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती नाही. शाळा, महाविद्यालय बंद होत आहेत. मग गरिबांच्या मुलांनी शिक्षण कसे घ्यायचे? प्रारंभी शिवाजी चौक ते मेळावा मैदानापर्यंत रॅली काढण्यात आली. याप्रसंगी धनंजय मुंडे, चित्राताई वाघ, नवाब मलीक यांनी सरकारवर हल्लाबोल केला. माजी आ. शंकरअण्णा धोंडगे यांनी आपल्या खास शैलीतून स्थानिक आमदारावर चांगलेच तोंडसूख घेतले. यशस्वीतेसाठी डॉ. सुनील धोंडगे, विलास पाटील घोरबांड, दत्ता पाटील तळणीकर, माधव पाटील मोरे, संतोष पाटील दगडगावकर, मनोज पा. मोरे आदींनी सहकार्य केले.संविधान बचाव रॅलीमुळेच तिरंगा रॅली४जनतेचे प्रश्न सरकारसमोर मांडण्याचा आणि तो सोडविण्यासाठी वेळप्रसंगी आंदोलन करण्याचा अधिकार विरोधी पक्षाला असतो़ परंतु, विरोधी पक्षाने जाहीर केलेला कोणताही कार्यक्रम चिरडून जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न भाजप करीत आहे़ येत्या २६ जानेवारीला सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येवून संविधान बचाव रॅली काढण्याचा निर्णय घेतला़ ही रॅली अयशस्वी करण्यासाठीच भाजपने तिरंगा रॅली काढण्याचे नियोजन केल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री तथा विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केला़ सरकारच्या तीन वर्षांच्या कार्यकाळात समाजातील कोणता घटक समाधानी आहे? असा सवालही त्यांनी केला़वाघाचा कासव झाला४बाळासाहेबानंतर आता शिवसेनेचा वाघ राहिला नाही तर तो शेळी झाला आहे़ नंतर तो ससा झाला, अन् आता तर कासव झाला. शिवसेनेत पूर्वीसारखी धमक राहिली नाही. शेपूट खाली घालून पळतो अशी अवस्था सेनेची झाल्याचे सांगत अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीकास्त्र सोडले़