शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

पोटनिवडणुकीपूर्वी भाजपला खिंडार; भास्करराव खतगावकर, ओमप्रकाश पोकर्णा कॉंग्रेसमध्ये परतणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2021 7:07 PM

नांदेड जिल्ह्यात खा. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या एककल्ली कारभाराला वैतागून आपण पक्ष सोडत असल्याची प्रतिक्रिया खतगावकर यांनी दिली.

नांदेड- देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना त्या मतदारसंघात वर्चस्व असलेले भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्यासह माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनी भाजपला रामराम केला आहे. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला असून, काँग्रेसची ताकद वाढली आहे.

नांदेड जिल्ह्यात खा. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या एककल्ली कारभाराला वैतागून आपण पक्ष सोडत असल्याची प्रतिक्रिया खतगावकर यांनी दिली. तीन वेळेस देगलूर-बिलोली मतदारसंघाचे आमदार आणि तीन वेळेस खासदार असलेले भास्करराव पाटील खतगावकर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपत आले होते. त्या वेळी जिल्हा भाजपची सर्व सूत्रे त्यांच्या हातात होती. परंतु, मागील लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रताप पाटील चिखलीकर हे सेनेतून भाजपत आले. भाजपच्या तिकिटावर निवडून येत त्यांनी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा पराभव केला होता. त्यामुळे पक्षात त्यांचे वजन वाढले होते. त्यानंतर जिल्हा भाजपतील सर्व निर्णय चिखलीकर हेच घेत होते. त्यामुळे खतगावकर गोटात नाराजी होती.

राजकीय समीकरणे बदलणारदेगलूर-बिलोली मतदारसंघ पोटनिवडणुकीत उमेदवार ठरवतानाही खतगावकर यांचे मत विचारात घेतले नाही. याबाबत पक्षनेतृत्वाकडे तक्रार करूनही नेतृत्वाने चिखलीकरांनाच ताकद दिली. त्यामुळे खतगावकर यांनी अखेर भाजपला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये घरवापसीचा निर्णय घेतला. रविवारी पत्र परिषद घेऊन त्यांनी ही घोषणा केली. त्यांच्यासोबत माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा आणि समर्थकांनीही भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. खतगावकरांच्या घरवापसीमुळे बिलोली मतदारसंघातील राजकीय गणितेही बदलणार आहेत. भाजपला मोठा धक्का आहे.

काँग्रेस प्रवेशाच्या घोषणेचे स्वागत- चव्हाणदरम्यान, पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी प्रतिक्रिया देताना नेते माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या घोषणेचे मी स्वागत करीत असल्याचे म्हटले तसेच खतगावकरांच्या प्रवेशामुळे मराठवाड्यातील पक्षसंघटनेला अधिक बळकटी मिळेल.

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसNandedनांदेड