तक्रारी नाेंदविण्यास पुढे या
देवसरकर यांच्या माेबाइलचे सीडीआर काढल्या जात आहेत. त्यात किती लाेकांना संपर्क केला गेला, याची हिस्ट्री पुढे येणार आहे. त्याचवेळी शासकीय अधिकाऱ्यांनीही त्यांना कुणी खंडणी अथवा पैशाची मागणी केली असेल तर तक्रार देण्यासाठी बिनधास्त पुढे यावे, असे आवाहन ठाणेदार घाेरबांड यांनी केले आहे.
आधीचा प्रवास आणि भक्कम आर्थिक स्थिती
माधव देवसरकर यांनी पत्नीला मेसेज पाठविणे, डाेळ्याने इशारे करणे असे कृत्य केल्याचे त्यांच्याच संघटनेतील एका निकटवर्तीय पदाधिकाऱ्याने पत्रपरिषदेत सांगितले हाेते. त्याचवेळी देवसरकरांनी गुटखा माफिया-विक्रेते, वनविभाग, अन्न व औषध प्रशासन विभाग व इतर अधिकाऱ्यांना सामाजिक कार्यक्रमाच्या निमित्ताने पैशासाठी किती दिवस आधी व काेणत्या क्रमांकावरून काॅल केले, याचा लेखाजाेखाही पत्रपरिषदेत मांडला हाेता. या निमित्ताने देवसरकरांचा आधीचा ‘प्रवास’, सध्याची ‘भक्कम’ स्थिती व त्यामागील संघटनेच्या आडाेश्याने शासकीय कार्यालयांच्या माध्यमातून चालणारे ‘अर्थ’कारण याची समाजात उघड चर्चा हाेऊ लागली आहे.
विनाविलंब गुन्हा दाखल करू - ठाणेदार
विनयभंगाच्या निमित्ताने वसुली प्रकरणाचे बिंग फुटल्याने समाजात व ‘वसुली’मुळे त्रस्त शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये समाधानही व्यक्त केले जात आहे. महिलांच्या छेडखानी, विनयभंगाबाबत आणखीही तक्रारी आल्यास विनाविलंब गुन्हा दाखल केला जाईल, अशी ग्वाही नांदेड ग्रामीणचे ठाणेदार अशाेक घाेरबांड यांनी ‘लाेकमत’शी बाेलताना दिली.