नांदेड : मागील विधानसभा निवडणुकानंतर भाजपानेनांदेडात फोडाफोडीचे राजकारण केले़ त्यामुळे अनेक शिवसैनिकांनी जय महाराष्ट्र करीत भाजपाचे कमळ हाती धरले होते़ त्यामुळे जिल्ह्यात भाजपा अन् सेनेचा संघर्ष तीव्र झाला होता़ त्यात आता लोकसभेसाठी दोन्ही पक्षांनी युती केली आहे़ परंतु भाजपाने नांदेडचा उमेदवार ठरविताना सेनेला विश्वासात घ्यावे अन्यथा पुन्हा कलह निर्माण होईल अशी इशारेवजा गळ सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घातली आहे़विधानसभा निवडणुकानंतर नांदेडात भाजपाने आक्रमक पवित्रा घेत मित्रपक्ष असलेल्या सेनेच्या पदाधिकाऱ्यांना फोडण्याचा सपाटा सुरु केला होता़ महापालिकेच्या निवडणुकीपूर्वीच शिवसेनेचे आजी-माजी मिळून नऊ नगरसेवकांनी सेनेला जय महाराष्ट्र केला होता़ त्यात शहरातध्यक्ष असलेले बाळू खोमणे, जिल्हाप्रमुख मिलींद देशमुख, माजी विरोधी पक्ष नेता दीपकसिंह रावत, महेंद्र खेडकर, विनय गुर्रम, आनंद जाधव, वैजनाथ देशमुख यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा सहभाग होता़ ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपाने जिल्ह्यात सेनेला मोठे खिंडार पाडले होते़तत्पूर्वी विधानसभा निवडणुकांच्या वेळी माजी खा़सुभाष वानखेडे यांनाही भाजपाने आपल्या जाळ्यात ओढले होते़ तर लोहा-कंधारचे आ़प्रताप पाटील चिखलीकर हे मनपा निवडणुकीत भाजपाची धूरा सांभाळत होते़ भाजपात अधिकृत प्रवेश न करताही चिखलीकर भाजपाच्या व्यासपीठावरुन सेनेवर तोफा डागत होते़
- दोन्ही पक्षातील या भांडणामुळे महापालिका निवडणुकीत दोघांचेही पाणीपत झाले होते़ तसेच फोडाफोडीच्या राजकारणामुळे नांदेडात भाजप-सेनेतील संघर्ष तीव्र झाल्याचे दिसून येत होते़ गेल्या चार वर्षात तर दोन्ही पक्षातील पदाधिकारी एकमेकांना पाण्यात पाहत होते़ विकासकामांच्या श्रेयावरुनही पदाधिकाºयांमध्ये चढाओढ सुरु होती़ परंतु आता लोकसभा निवडणुकीत भाजपा-सेनेने युती केल्यामुळे दोन्ही पक्षाच्या नांदेडातील नेत्यांची गोची झाल्याचे दिसून येत आहे़ फोडाफोडीच्या राजकारणामुळे घायाळ झालेल्या सेनेच्या पदाधिकाºयांना आता भाजपासोबत प्रचार करावा लागणार आहे़ परंतु लोकसभेसाठी उमेदवार ठरविताना भाजपाने सेनेला विश्वासात घ्यावे अशी गळ घालत सेनेला पसंद नसलेला उमेदवार दिल्यास पुन्हा दोन्ही पक्षात कलह निर्माण होईल़ असा इशाराही सेनेच्या पदाधिकाºयांकडून दिला जात आहे़ त्यामुळे भाजप लोकसभेसाठी कोणता उमेदवार देतो त्याला शिवसेनेकडून कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे़
- विधानसभा निवडणुकीत प्रताप पाटील चिखलीकर आणि हेमंत पाटील यांचा गळ्यात गळा होता़ परंतु त्यानंतर विष्णूपुरीच्या पाणी आणि इतर विषयावरुन वितुष्ट निर्माण झाले़ त्यानंतर दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर तोंडसुख घेण्याची एकही संधी सोडली नाही़ या दोघांमध्ये आजघडीला विस्तवही जात नाही़ हे सर्वज्ञात आहे़ त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीसाठी या दोघांमध्ये दिलजमाई होईल का? यावरही बरेच गणित अवलंबून आहे़
- १९९० पासून नांदेडात शिवसेनेचा दबदबा होता़ तत्कालीन आ़प्रकाश खेडकर यांच्यानंतर मात्र सेनेला गळती लागली़ राज्याप्रमाणे नांदेडातही सेना मोठा तर भाजप छोटा भाऊ होते़ परंतु विधानसभा निवडणुकीनंतर सगळे चित्र बदलले़ भाजपाने सर्व शक्ती पणाला लावून शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षातील पदाधिकाºयांना फोडण्याचा सपाटा सुरु केला़ यामध्ये सर्वाधिक नुकसान शिवसेनेचेच झाले़ मनपा निवडणुकीत अवघा एक उमेदवार त्यांना निवडून आणता आला़ तर भाजपाच्या सहा जागा आल्या़ त्यामुळे नांदेडातही आता भाजपा मोठ्या भावाच्या भूमिकेत वावरत आहे़ अन् नेमके हिच सेनेच्या पदाधिकाºयांना सलते आहे़