भाजप प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव खतगावकर कॉंग्रेसच्या वाटेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2021 01:28 PM2021-10-15T13:28:54+5:302021-10-15T13:31:33+5:30

Bhaskarrao Khatgaonkar : भाजपमध्ये आपल्याला न्याय मिळाला नाही. पुढे आपण काय निर्णय घ्यावा यावर विचार करण्यासाठी झाली खास बैठक

BJP state vice president Bhaskarrao Khatgaonkar on the way to enter in Congress | भाजप प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव खतगावकर कॉंग्रेसच्या वाटेवर

भाजप प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव खतगावकर कॉंग्रेसच्या वाटेवर

googlenewsNext
ठळक मुद्देखतगावकर जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहीलआम्ही कोणत्याची पक्षांशी बांधील नाहीतअशी भूमिका या वेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी माडंली.

नांदेड : माजी मंत्री तथा भाजपचे ( BJP ) प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव खतगावकर ( Bhaskarrao Khatgaonkar) लवकरच कॉंग्रेसमध्ये ( Congress )जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. गुरुवारी त्यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांची बैठक शंकरनगर ( ता. बिलोली ) येथे झाली. 

भाजपमध्ये आपल्याला न्याय मिळाला नाही. पुढे आपण काय निर्णय घ्यावा यावर विचार करण्यासाठी ही बैठक खतगावकर यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. खतगावकर जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील, आम्ही कोणत्याची पक्षांशी बांधील नाहीत, अशी भूमिका या वेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी माडंली. मेळाव्याला बिलोली तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत खातगावकरांनी अंग काढून घेतल्याचा फटका भाजप उमेदवाराला बसण्याची शक्यता आहे. 

अशोकराव चव्हाण यांचे मेहुणे
राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण ( Ashok Chavhan ) यांच्या बहीण स्नेहलता यांचे खतगावकर हे पती आहेत. तीन वेळा बिलोलीतून आमदार व नांदेडचे खासदार म्हणून खतगावकर निवडून आले. राज्यमंत्री राहिले. सात वर्षांपूर्वी अशोकराव चव्हाण यांच्या  कार्यपद्धतीवर ठपका ठेवत त्यांनी कॉंग्रेस सोडली होती. दरम्यान,  सूर्यकांता पाटील, डॉ. माधवराव किन्हाळकर यांच्यासह खतगावकरांचीही भाजपने उपेक्षाच केल्याचे चित्र आहे.

भाजपने स्नुषा डॉ. मीनल यांना उमेदवारी नाकारली 
भाजपमध्ये विनाअट प्रवेश केलेल्या भास्करराव पाटील-खतगावकर यांनी जिल्ह्यातील अनेक काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेस समर्थकांना भाजपमध्ये आणले. याचा फायदा भाजपला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत झाला. मात्र, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत नायगांव मतदारसंघातून खतगावकर यांच्या स्नुषा डॉ. मीनल खतगावकर यांना भाजपने उमेदवारी डावलली होती. तेव्हापासून त्यांची भाजप श्रेष्ठींच्या विरोधात नाराजी वाढत गेली असल्याची चर्चा आहे.

 

Web Title: BJP state vice president Bhaskarrao Khatgaonkar on the way to enter in Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.