शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

अशोक चव्हाणांच्या विरोधात भाजप बापूसाहेब गोरठेकरांना उतरविणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2019 2:44 AM

लोकसभेनंतर अशोक चव्हाण यांनी भोकर मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले असून मोठ्या प्रमाणात जनसंपर्क वाढविला आहे

विशाल सोनटक्के नांदेड : काँग्रेसचा पारंपारिक बालेकिल्ला म्हणून भोकर विधानसभा मतदारसंघाची ओळख आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेस नेते अशोक चव्हाण रिंगणात उतरण्याची चिन्हे आहेत. या अनुषंगाने सुरू असलेली विरोधकांची शोध मोहीम थांबली असून या मतदारसंघातून चव्हाण यांच्या विरोधात राष्ट्रवादीतून नुकताच भाजपात प्रवेश केलेले बापूसाहेब गोरठेकर यांना रिंगणात उतरविले जाणार हे आता स्पष्ट झाले आहे.

२००९ च्या विधानसभा निवडणुकीत तब्बल १ लाख ७ हजाराहून अधिक मते घेवून अशोक चव्हाण या मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत अमिता चव्हाण यांनी पुन्हा काँग्रेसचा झेंडा फडकविला. येणाºया निवडणुकीत अशोक चव्हाण पुन:श्च या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे संकेत मिळत आहेत. या अनुषंगाने भाजपाकडून सक्षम उमेदवाराचा शोध सुरू होता. लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या प्रताप पाटील चिखलीकर यांच्या मदतीला धावून गेलेले राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बापुसाहेब गोरठेकर यांनी नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला असून विधानसभा निवडणुकीत गोरठेकर हे चव्हाण यांच्या विरोधात लढण्याची शक्यता आहे.

लोकसभेनंतर अशोक चव्हाण यांनी भोकर मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले असून मोठ्या प्रमाणात जनसंपर्क वाढविला आहे. या पार्श्वभूमीवर गोरठेकर चांगली लढत देतील, अशी भाजपाला अपेक्षा आहे. प्रताप चिखलीकर यांनीही या मतदारसंघात गोरठेकरांना ताकद देण्यास सुरुवात केल्याने भाजपासमोरचा उमेदवारीचा प्रश्न संपला आहे. काँग्रेसच्या या बालेकिल्यात भाजपा किती ताकदीने उभी राहते यावरच लढतीचे चित्र अवलंबून असेल.पाच वर्षांत काय घडले?भोकर विधानसभा मतदारसंघाचे अशोक चव्हाण यांनी प्रतिनिधीत्व केलेले आहे. लोकसभेवर निवडून गेल्यानंतर त्यांच्या जागेवर अमिता चव्हाण निवडून आल्या.काँग्रेसचा हक्काचा मतदारसंघ म्हणून भोकरकडे पाहिले जाते. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बापुसाहेब गोरठेकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला असून संभाव्य उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.गोरठेकर यांच्याबरोबर भोकर आणि उमरी तालुक्यातील राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपाचा झेंडा खांद्यावर घेतल्याने भाजपा या मतदारसंघातून चांगली लढत देण्याची चिन्हे आहेत.भोकर मतदारसंघाशी काँग्रेसचे जिव्हाळ्याचे नाते राहिलेले आहे. शंकरराव चव्हाणांपासून अशोक चव्हाणांनी या भागाच्या विकासासाठी मोठे योगदान दिलेले आहे. येणाºया निवडणुकीतही या मतदारसंघातील जनता काँग्रेससोबतच राहील. ताकद नसल्यानेच विरोधकांवर उमेदवार आयातीची वेळ आली आहे. - अमिता चव्हाण, आमदार, भोकर

टॅग्स :bhokar-acभोकरAshok Chavanअशोक चव्हाणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019