नांदेड : महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी भाजपच्या गुरप्रीतकौर सोढी यांची आज झालेल्या सर्वसाधारण सभेत निवड करण्यात आली. भाजपा सदस्यांच्या अनुपस्थित कॉंग्रेसने ही निवड करुन भाजपाला जोरदार धक्का दिला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भाजपाच्या महानगराध्यक्षानी सोढी यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्याची शिफारस केली होती. मात्र हा विषय मागील ८ महिन्यांपासून प्रलंबित होता. आज झालेल्या सभेपुढे हा विषय ठेवण्यात आला होता. मात्र त्याचवेळी भाजपाच्या ५ नगरसेवकांनी पक्षादेश डावलून सोढी ऐवजी दीपकसिंह रावत यांची निवड करावी पत्र एक दिवस आधी दिले. आज झालेल्या सर्वसाधारण सभेत भाजपचे ते 5 नगरसेवक अनुपस्थित राहिले.
कॉंग्रेसने मात्र सोढी यांची विरोधी पक्षनेते पदी एकमताने निवड केली. भाजपा सदस्यांच्या अनुपस्थित कॉंग्रेसने ही निवड करुन भाजपाला जोरदार धक्का दिला आहे. महापौर शीला भवरे, सभागृह नेता वीरेंद्रसिंघ गाडीवाले, उपमहापौर विनय गिरडे, माजी महापौर अब्दूल सत्तार, अमितसिंह तेहरा, आनंद चव्हाण यांनी याप्रकरणात महत्वाची भूमिका राहिली.