मुखेड मतदारसंघातील आठ जि.प.गटात भाजपाला आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 12:13 AM2019-05-26T00:13:21+5:302019-05-26T00:13:57+5:30

नांदेड लोकसभा निवडणुकीत मुखेड-कंधार मतदार संघातील जिल्हा परिषदेच्या ९ गटांपैकी ८ ठिकाणी भाजपाला आघाडी तर बेटमोगरा जिल्हा परिषद गटातून काँग्रेसला आघाडी मिळाली. याबरोबरच मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार खा.प्रताप पाटील चिखलीकर यांना जिल्ह्यात सर्वाधिक ३५ हजार ८८२ मतांची आघाडी दिली.

BJP's lead in eight districts of Mukhed constituency | मुखेड मतदारसंघातील आठ जि.प.गटात भाजपाला आघाडी

मुखेड मतदारसंघातील आठ जि.प.गटात भाजपाला आघाडी

Next
ठळक मुद्देबेटमोगरा जि.प.गटाने काँग्रेसला तारले मुखेड शहरातही भाजपाला आघाडी

दत्तात्रय कांबळे।
मुखेड: नांदेड लोकसभा निवडणुकीत मुखेड-कंधार मतदार संघातील जिल्हा परिषदेच्या ९ गटांपैकी ८ ठिकाणी भाजपाला आघाडी तर बेटमोगरा जिल्हा परिषद गटातून काँग्रेसला आघाडी मिळाली. याबरोबरच मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार खा.प्रताप पाटील चिखलीकर यांना जिल्ह्यात सर्वाधिक ३५ हजार ८८२ मतांची आघाडी दिली.
जांब(बु.) गटामध्ये बुथ क्र.१११ ते ११५ या पाच बुथवर अशोकराव चव्हाण यांना १२५५ तर प्रताप पाटील चिखलीकर यांना १३४१ मते मिळाली़ तर प्रा.डॉ.यशपाल भिंगे यांना ३५६ मते मिळाली. सावरगाव(पी) गटामध्ये बुथ क्र.१८४ ते १८७ या चार बुथवर अशोकराव चव्हाण यांना ७७४ तर प्रताप पाटील चिखलीकर यांना ८२६ मते तर प्रा.डॉ.यशपाल भिंगे यांना २४४ मते मिळाली. यात चिखलीकर यांना चव्हाण यांच्यापेक्षा ५२ मतांची आघाडी आहे. एकलारा गटामध्ये बुथ क्र.२१३ ते २१६ या चार बुथवर अशोकराव चव्हाण यांना ५१२ तर चिखलीकर यांना ८८५ मते व प्रा.डॉ.यशपाल भिंगे यांना १८० मते मिळाली. यात चिखलीकर यांनी ३६३ मतांची आघाडी घेतली. येवतीमध्ये बुथ क्र.२२६ ते २३० या पाच बुथवर चव्हाण यांना ६६६ तर चिखलीकर यांना ९९० मते व भिंगे यांना २१६ मते मिळाली. यात चिखलीकर यांना चव्हाण यांच्यापेक्षा ३२४ मतांची आघाडी आहे. बाºहाळी गटामध्ये बुथ क्र.२६६ ते २७१ या सहा बुथवर अशोकराव चव्हाण यांना १३०१ तर प्रताप पाटील चिखलीकर यांना १६९५ मते मिळाली व भिंगे यांना १५३ मते मिळाली. चिखलीकर यांना चव्हाण यांच्यापेक्षा ३९४ मतांची आघाडी आहे.
मुक्रमाबाद गटामध्ये बुथ क्र.३०९ ते ३१६ या आठ बुथवर चव्हाण यांना ९०४,चिखलीकर यांना १८७५ मते मिळाली तर भिंगे यांना ३०४ मते मिळाली. बेटमोगरा गटामध्ये तीन बुथवर अशोकराव चव्हाण यांना ८८७ तर चिखलीकर यांना ४८७ मते मिळाली व भिंगे यांना १७० मते मिळाली. यात चव्हाण यांना चिखलीकर यांच्यापेक्षा ३०० मतांची आघाडी आहे.
कंधार तालुक्यातील पेठवडज गटात अशोकराव चव्हाण यांना १४७० तर प्रताप पाटील चिखलीकर यांना १६४४ तर भिंगे यांना १९३ मते मिळाली. कुरळा गटामध्ये पाच बुथवर अशोकराव चव्हाण यांना ८५२ तर चिखलीकर यांना १६२९ मते मिळाली तर प्रा.डॉ.यशपाल भिंगे यांना ८१५ मते मिळाली.यात चिखलीकर यांना ७७७ मतांची आघाडी आहे.

Web Title: BJP's lead in eight districts of Mukhed constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.