शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
2
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
3
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
4
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
5
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
6
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
7
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
8
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
9
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
10
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
11
‘जात’ जाते कधी, येते कधी?; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नवे आकलन देणारा ठरलाय
12
सोशल मीडियाच्या राक्षसाने मुलांना गिळू नये, म्हणून...
13
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
14
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
15
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
16
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
17
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
18
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
19
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
20
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान

घरावर काळे झेंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 4:14 AM

जि. प. शाळेत गणवेश वाटप लोहा : तालुक्यातील सोनखेड जि. प. शाळेत गणवेश, पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली. याशिवाय सरपंच ...

जि. प. शाळेत गणवेश वाटप

लोहा : तालुक्यातील सोनखेड जि. प. शाळेत गणवेश, पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली. याशिवाय सरपंच अच्युत मोरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शा.व्य.स.चे अध्यक्ष यादव मोरे, शंकर मोरे, गोविंदराव मोरे, मुख्याध्यापिका कदम, शेख, जांभूळकर आदी उपस्थित होते.

शिवसेनेचा वर्धापन दिन

भोकर : शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त भोकर शहरात शिवसेनेच्या वतीने ध्वजारोहण, वृक्षारोपण आदी कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते शिवाजी पाटील, माधव पाटील, सुभाष नाईक, प्रदीप दौलतदार, रमेश महागावकर, गणेश आरलवाड, बालाजी येलपे, पांडूरंग वर्षेवार, राणी जोशी, जयश्री खांडरे आदी उपस्थित होते.

शेतकऱ्यांची लूट

हिमायतनगर : तालुक्यातील ग्रामीण भागातील गाववस्तीच्या ठिकाणी काही कृषी सेवा केंद्रांकडून बी-बियाणे व रासायनिक खतांचा तुटवडा निर्माण करून शेतकऱ्यांची लुबाडणूक सुरू आहे. कृषी अधिकारी, कर्मचारी बघ्याची भूमिका घेत असल्याने बळीराजा संकटात सापडला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

तालुकाध्यक्षपदी गोणेकर

उमरी : मानवहित लोकशाही पक्षाच्या उमरी तालुकाध्यक्षपदी आनंदा गोणेकर यांची तर संतोष हैबतकर यांची कामगार आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी नियुक्ती झाली. यावेळी मराठवाडा सचिव बालासाहेब खानजोडे, प्रवीण बसवंते, किशनराव इंगळे आदी उपस्थित होते.

ओबीसी समितीचे निवेदन

मुखेड : विविध मागण्यांसाठी ओबीसी समन्वय समितीच्या वतीने तहसीलदार काशीनाथ पाटील यांना निवेदन देण्यात आले. शिष्टमंडळात विश्वनाथराव कोलमकर, डॉ. श्रावण रॅपनवाड, कल्याणराव पाटील, राजू केंद्रे, रियाज शेख, एस. के. बबलू, शिवकुमार बंडे, प्रा.निळू पवार, बालाजी पाटील आदी उपस्थित होते.

पालकमंत्र्यांना दिले निवेदन

बिलोली : हुनगुंदा ग्रामपंचायतीच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांना देण्यात आले. यावेळी सरपंच पोसनबाई प्याटेकर, उपसरपंच अनुसयाबाई भाले, नागेश प्याटेकर, योगेश भाले, संजय गायकवाड, महेंद्र मराठे, गंगाधर भाले उपस्थित होते.

रानडुकराच्या धडकेत जखमी

अर्धापूर : तालुक्यातील कारवाडी शिवारात उसाच्या शेतात रानडुकराने धडक दिल्याने ४० वर्षीय शेतमजूर जखमी झाल्याची घटना घडली. अनिल उत्तमराव हारळ असे जखमीचे नाव आहे. पांडुरंग देशमुख तरोडेकर यांच्याकडे ते काम करतात. कारवाडी शिवारातील उसाच्या शेतात अनिल हारळ सोमवारी गेले असता ही घटना घडली.

इंधन दरात कपात करा

माहूर : पेट्रोल व डिझेल दरामध्ये २५ टक्क्यांची कपात करावी, अशी मागणी एमआयएमच्या वतीने माहूर तहसीलदारांकडे करण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्ष शेख सिराज राजा, उपाध्यक्ष शेख अल्लाबक्ष, सचिव अरमान पठाण, शेख वसीम सय्यद, मोईन सय्यद, रज्जाक शेख, सय्यद साद, इरशाद शेख, शेख इसाद आदी उपस्थित होते.

मुक्रमाबाद-नांदेड बस सुरू

मुक्रमाबाद : मुक्रमाबाद-बिहारीपूर-नांदेड बससेवा सुरू झाली आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांनी याकामी पाठपुरावा केला. यामुळे तालुक्याच्या कामासाठी मुखेडला जाणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.

चिखलीकर यांना निवेदन

धर्माबाद : तालुक्यातील विविध प्रश्नासंदर्भात भाजपाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पोतगंठीवार यांनी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. रेल्वे भुयारी मार्गातील पाण्यासाठी विसर्ग करावा, रजिस्ट्री कार्यालयाची जागा उपलब्ध करून द्यावी, येताळा एसबीआयतील इंटरनेटची समस्या आदींकडे पोतगंठीवार यांनी चिखलीकरांचे लक्ष वेधले. लवकरच या समस्या सोडवण्यात येतील, असे आश्वासन चिखलीकरांनी त्यांना दिले.

शेतकऱ्यांची लूट थांबवा

मुखेड : रासायनिक खते व सोयाबीनच्या बियांमध्ये व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होत असलेली लूट थांबवण्यात यावी, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांनी केली. मागणीचे निवेदन कृषी अधीक्षक चलवदे यांना त्यांनी दिले. हवी असलेली खते, बियाणे दिली जात नाहीत. वाढीव किमतीमध्ये विक्री केली जात आहे, बँडेड कंपनीच्या सोयाबीनच्या बॅगा बाजारातून गायब करण्यात आल्या, आदी मांजरमकर यांनी नमूद केले.

मालट्रक उलटला

लोहा : तालुक्यातील हरसद पाटीजवळ मालट्रक उलटला. मात्र सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मालट्रकमध्ये बियाणांचे पोते होते. ट्रक पलटी झाल्यानंतर पोते रस्त्यावर पडली. ट्रकचालक फुटलेल्या काचेतून सहीसलामत बाहेर पडला. सोनखेड पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आहे.

सचिवपदी अबरार बेग

बिलोली : काँग्रेस अल्पसंख्याक सेलच्या तालुका सचिवपदी अबरार बेग यांची माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निवड करण्यात आली. पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते बेग यांना नियुक्तिपत्र देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष शमीम अब्दुल्ला, माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी, तालुकाध्यक्ष फेरोजखान, वलीयोद्दीन फारुखी, नगरसेवक शाहेद बेग, जावेद कुरेशी, अमजद चाउस आदी उपस्थित होते.

सारंग चव्हाण यांचा सन्मान

मांडवी : प्रतिकूल परिस्थितीवर मात करून तहसीलदार बनलेले सारंग चव्हाण यांचा मांडवी येथील अष्टविनायक गणेश मंडळाकडून गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार सुनील श्रीमनवार, माजी सरपंच दीपक चव्हाण, अध्यक्ष विनोद पाटील, डॉ. दीपू चव्हाण, मुख्याध्यापक संतोष बंपलवार, सचिन चव्हाण, शिवकुमार ठाकूर, अविनाश चव्हाण, दिलीप राठोड, प्रकाश चव्हाण, अमोल राठोड, प्रदीप सावकार, विजय राठोड, प्रवीण चव्हाण, शैलेश नीळकंठवार, विनोद चव्हाण आदी उपस्थित होते.

कुंटुरफाटा परिसरात अवैध दारू विक्री

कुंटूर : येथील कमानीच्या बाजूस असणाऱ्या पेट्रोल पंपासमोरील धाब्यावर तसेच आजूबाजूचे हॉटेल, धाब्यावर विनापरवाना अवैध दारूची विक्री सुरू होत आहे. राज्य उत्पादन शुल्क तसेच पोलीस याकडे दुर्लक्ष करीत आहेत. बसथांब्यावर उतरताच दारुड्यांचा सामना करावा लागतो. या प्रकारामुळे अल्पवयीन तरुण व्यसनाधीन बनले आहेत. आरोग्यावर परिणामदेखील होत आहे.