लोकमत न्यूज नेटवर्कबारूळ (ता. कंधार) : बारूळ, उस्माननगर मंडळात २१ व २२ रोजी मुसळधार पाऊस तर २३ जून रोजी ढगफुटी झाली होती़ यात जीवितहानी झाली नसली तरी वित्तहानी मोठी झाली़ या नुकसानीत पंचनाम्यामध्ये तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवकाने मात्र नुकसान निरंकचा अहवाल मंडळ अधिकाऱ्यांमार्फत तहसील कार्यालयाकडे सादर केल्याने शेतकºयात संताप व्यक्त होत आहे़या घटनेमुळे अधिकारी व पदाधिकाºयांनी केलेली पाहणी हे नाटक होते का? असा प्रश्न शेतकरी व नागरिक करीत आहेत़ या अहवालसाठी तब्बल चार महिने लागल्याने संशय निर्माण होत आहे़बारूळ महसूल मंडळातील २० गावे असून त्यात बारूळ, रहाटी, वरवंट, मजरे वरवंट, चौकीपाया, कौठा, कौठावाडी, शिरूर, काटकळंबा, तेलूर, चिखली, औराळ, हिस्से औराळ, मंगलसांगवी, नंदनवन, हाळदा, भूकमारी, धानोरा कौठा, चौकी महाकाया तर उस्माननगर मंडळात शिराढोण, भुत्याचीवाडी, आलेगाव, दाताळा, सावळेश्वर, लाठी बु़, भंडार कुमठ्याचीवाडी, बामणी (पक़़), दहीकळंबा, लाडका, मुंडा, दिंडा, बिंडा, पांगरा, संगुचीवाडी, खुड्याचीवाडी या गावांत सलग तीन पाऊस व ढगफुटी झाल्याने घराघरांमध्ये पाणीच पाणी, तसेच रस्ते, गल्लीमध्ये तीन फूट ते चार फूट पाणी वाहू लागले होते़ यात संसारोपयोगी सामानासह घरातील शेती उपयोगी व शेतातील खते, साहित्य वाहून गेले़ शेती खरडून गेली़ शेतातील उभी पिके वाहून गेली़ दगडी पऊळ वाहून गेले होते़या ढगफुटीमध्ये बारूळ महावितरण कंपनीचे २ लाख ३० हजारांचे नुकसान झाले होते़ अनेकांची घरे पडली़ या सर्व घटनेने नागरिक भयभीत झाले होते़ या घटनेची माहिती कळताच २४ रोजी आजी-माजी आमदार, उपविभागीय अधिकारी, विविध पक्षाचे लोकप्रतिनिधींनी पाहणी केली व नागरिक-शेतकºयांना दिलासा दिला़ काही लोकप्रतिनिधींनी तातडीने संसारोपयोगी सामानासाठी आर्थिक मदत केली़
- तालुक्याच्या तत्कालीन तहसीलदार अरुणा संगेवार यांनी संबंधित सज्जाचे तलाठी, ग्रामसेवक, कृषी अधिकारी यांन पत्र काढून सांगितले की बारूळ, उस्माननगर मंडळातील पाहणी केली असता शेती, पिकांची व नागरिकांचे मोठे नुकसान झाले़ त्याचे पंचनामे करण्याचे आदेश दिले़ आदेशानुसार कृषी सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक यांनी पंचनामे केले़ बारूळ, उस्माननगर मंडळातील शेती व पिकांची नुकसान निरंक अशी माहिती मंडळ अधिकारी यांच्या अहवालातून तहसील कार्यालयाकडे देण्यात आली़ तब्बल चार महिन्यांपासून शेतकरी, नागरिक झालेल्या नुकसान भरपाईची मदतीची प्रतीक्षा करत होते.
- बारूळ, उस्माननगर मंडळात झालेल्या अतिवृष्टीत शेती व पिकांचे नुकसान मंडळ अधिकारी यांच्या अहवालानुसार निरंक आहे - उत्तम जोशी (लिपीक), नैसर्गिक व आपत्ती व्यवस्थापन, तहसील कार्यालय, कंधाऱ
- तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांच्या पंचनाम्यानुसार सदरील माहिती तहसील कार्यालयाकडे पाठविण्यात आली़ याकामी १३ तलाठी, १३ कृषी सहाय्यक, १३ ग्रामसेवकांनी काम केले -एम़ई़मेथे (मंडळ अधिकारी, बारूळ)
- बारूळ, उस्माननगर मंडळातील झालेल्या ढगफुटीमुळे पिकांचे व शेतीचे नुकसान कृषी, तलाठी, ग्रमासेवकाने निरंक दाखविलेली बाब चुकीची असून शेती व पिकांचे अंदाजे ३०० हेक्टर नुकसान झालेला प्राथमिक अंदाज असताना नुकसान निरंक दाखविले़ शेतकºयाला नुकसान भरपाई न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल -गुलाब जाधव, छावा तालुका उपाध्यक्ष, कंधाऱ
- शेतीवरील पंचनामे झालेले व नंतर झालेले पंचनामे वेगळे आहेत? याविषयी जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात येईल -सत्यनारायण मानसपुरे (पं़स़ सदस्य )