बसस्थानकात वृक्षारोपण
धर्माबाद - येथील बसस्थानकाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा पद्मा सतपलवार, गणेश गिरी, अनिल कमलाकर, साईप्रसाद पेकमवार, संतोष मोरे, वाहतूक नियंत्रक वसंत अनमोड, एस. आर. घंटे, दिगंबर पाटील, सुजाता कमलाकर, शेखर कमलाकर, आदित्य कमलाकर, गंगाराम गाजेवार, आदी उपस्थित होते.
पाण्याचा प्रश्न मिटला
धर्माबाद - तालुक्यातील जारीकोट येथे निजामकालीन तलाव पावसामुळे भरल्यामुळे या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. जनावरांच्याही पाण्याची सोय झाली. पावसाचे पाणी लहान-मोठ्या नाल्यांत व तलावांत साचल्याने जनावरे आपली तहान भागवीत आहेत.
बेमुदत संपात सहभाग
धर्माबाद - तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र करखेलीअंतर्गत आशा व गटप्रवर्तक विविध मागण्यांसाठी संपावर गेले आहेत. मागण्यांचे निवेदन वैद्यकीय अधिकारी डॉ. विश्वास यांना देण्यात आले. यावेळी विजयालक्ष्मी राऊतवार, सुरेखा येडपलवार, जनाबाई घाते, सुनीता माने, सुनीता कदम, सुनम बद्देवाड, शोभा रुद्रावाड, आदी उपस्थित होते.
दारूची चढ्या दराने विक्री
लोहा - तालुक्यात ठिकठिकाणी अवैध दारूची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे. शहरासह मारतळा, कलंबर, सोनखेड, पेनूर, लिंबोटी, आदी दहा ते बारा ठिकाणी देशी दारूची दुकाने आहेत. या दुकानांतून अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचा आरोप आहे.
जिल्हाध्यक्षपदी पदरे
कंधार - ग्रामीण रुग्णालयांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांची बैठक राज्याध्यक्ष भारत वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी यशवंतराव पदरे, तर सचिवपदी आशिष भाेळे यांची निवड झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्य महासचिव डॉ. उत्तमराव साेनकांबळे होते.
१० टक्के पेरण्या पूर्ण
देगलूर : १६ जूनपर्यंतच्या आकडेवारीनुसार तालुक्यात खरिपाच्या १० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या. तालुक्यात देगलूर मंडळ २१५.५ मि.मी., खानापूर १३७.९, मरखेल १७३.५, माळेगाव २०८.६०, शहापूर १९६.३, हणेगाव मंडळात १९२.१ मि.मी. पाऊस झाला. तालुक्यात सरासरी १८५.६ मि.मी. पावसाची नोंद झाली.
सर्कलप्रमुखपदी बाजगिरे
मुखेड - संभाजी ब्रिगेडच्या सावरगाव सर्कलप्रमुखपदी प्रदीप बाजगिरे यांची निवड झाली. तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले. या निवडीचे अनिल पाटील, मनोज पाटील, शिवशंकर पाटील, शिवराज हसनाळे, परवेज रावणगावकर, आदींनी स्वागत केले.
जलधारा ग्रामपंचायतीला भेट
किनवट - जिल्हाधिकारी डाॅ. विपीन इटणकर आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी गुरुवारी जलधारा ग्रामपंचायतीला भेट देऊन विविध कामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा आरोग्याधिकारी डाॅ. बालाजी शिंदे, गटविकास अधिकारी सुभाष धनवे, आदी उपस्थित होते.
विजेचा लपंडाव
मांडवी : विजेच्या लपंडावामुळे आणि एसबीआयच्या कनेक्टिव्हिटीच्या समस्येमुळे मांडवीकर त्रस्त झाले आहेत. रात्री-अपरात्री वीज येते आणि जाते हा प्रकार आता नवीन राहिला नाही. तशीच अवस्था एसबीआयमधील कनेक्टिव्हिटीची आहे. यामुळे पीककर्ज, पैसे उचल, भरणे, आदी कामे खोळंबत आहेत.
नामफलकाचे अनावरण
अर्धापूर - मनसेच्या अमराबाद तांडा शाखा नामफलकाचे अनावरण जिल्हाध्यक्ष माँटीसिंग जहागीरदार यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून महानगराध्यक्ष अब्दुल शफी, वाहतूक सेनेचे संतोष सुनेवाड, विद्यार्थी सेनेचे शक्ती परमार, शिवदास बारसे, माधव पावडे, ज्ञानेश्वर जाधव, साईनाथ रामगीरवार, जीवन कपाटे, आदी उपस्थित होते.
पेरणीला सुरुवात
मुक्रमाबाद - मुक्रमाबादसह परिसरातील बळिराजाने पेरणीला सुरुवात केली आहे. यंदा मृग नक्षत्रात वेळेवर पाऊस झाल्याने शेतकरी समाधानी असून तो बी-बियाणे, खतेखरेदीसाठी बाजारात पोहोचला आहे. ज्यांनी खरेदी केली, अशांनी पेरणीला सुरुवात केली आहे.
अध्यक्षपदी अमृतवाड
भोकर - हाडोळीचे सरपंच माधव अमृतवाड यांची भोकर तालुका सरपंच संघटनेच्या अध्यक्षपदी गुरुवारी निवड झाली. बैठकीला काँग्रेस तालुकाध्यक्ष जगदीश पाटील, सभापती बाळासाहेब रावणगावकर, नागनाथ घिसेवाड, राजू दिवशीकर, रामचंद्र मुसळे, उज्ज्वल केसराळे, गणेश कापसे, सतीश देशमुख, आदी उपस्थित होते.
पाठ्यपुस्तकांचे वाटप
उमरी - तालुक्यातील काैडगाव, एरंडल, महाटी गावांतील जिल्हा परिषदेच्या शाळेतील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. याशिवाय लसीकरण मोहीमही राबविण्यात आली. उपस्थित अधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले; तर झाडांच्या संगोपनाची जबाबदारी शाळेच्या शिक्षकांनी घेतली आहे.