शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
3
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
4
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
5
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
6
'पुष्पा २' चा ट्रेलर लाँच बिहारच्या 'पटना'मध्येच का झाला? मेकर्सने सांगितलं कारण
7
शेअर बाजारात वरच्या स्तरावर सेलिंग प्रेशर; सेल ऑन राईज स्ट्रक्चरमध्ये अडकला बाजार, Sensex आपटला
8
SBI Healthcare Opportunities Fund : २५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
9
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
10
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
11
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
12
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
13
Bharat Desai Syntel : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
14
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
15
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
16
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
18
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
19
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
20
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची

कुंटूर येथे रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 4:18 AM

दिव्यांगांना लाभ द्यावा बोधडी - किनवट तालुक्यातील दिव्यांगांना घरकूल योजनेचा लाभ देण्यात यावा अशी मागणी जिल्हाधिकारी तथा मुख्यमंत्र्यांकडे करण्यात ...

दिव्यांगांना लाभ द्यावा

बोधडी - किनवट तालुक्यातील दिव्यांगांना घरकूल योजनेचा लाभ देण्यात यावा अशी मागणी जिल्हाधिकारी तथा मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. दिव्यांग बांधव कुडांच्या तथा तट्ट्यांच्या घरामध्ये राहतात. प्रत्येक ग्रामपंचायतीने १० घरे दिव्यांगांसाठी राखीव ठेवावीत, प्रत्येक अपंगाला घरकूल योजनेचा लाभ देण्यात यावा अशी मागणीही निवेदनात करण्यात आली.

महामार्गावर खड्डे

मारतळा - नांदेड - हैदराबाद राज्य महामार्ग क्रमांक १६१ वर मोठे खड्डे पडल्याने सदर खड्डे जीवघेणे ठरत असून मारतळा बसथांबा जवळील खड्ड्यामुळे अनेकदा दुचाकीस्वारांचा अपघात ही झाला आहे. भविष्यातही अपघात होण्याची शक्यता असल्यामुळे संबंधितांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

ज्वारीचे मोठे नुकसान

बोधडी - बोधडी व परिसरात सोमवारी दुपारी अवकाळी पाऊस पडल्याने ज्वारी, तीळ, भुईमुगाचे मोठे नुकसान झाले. काही शेतकऱ्यांच्या काढणीला आलेला भुईमूग ही खराब झाला. यामुळे मोठे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. तहसील विभागाने नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी होत आहे.

४२२ जणांना कोरोना लस

लोहा - तालुक्यातील पोलीसवाडी येथील सर्व ग्रामस्थांनी कोरोनाला हरवण्याचा चंग बांधला. गावातील ४२२ नागरिकांनी कोरोनाची पहिली लस घेतली आहे. यावेळी सरपंच अनिता धुळगुंडे, उपसरपंच लक्ष्मण कवडे, पिराजी धुळगुंडे, ग्रा.पं. सदस्य ज्ञानेश्वर बाजगीर, गोविंद कोल्हे, नागराव कोल्हे, रेखा बाजगीर, फुलूबाई कोल्हे आदी उपस्थित होते. यासाठी डॉ.धनवे, डॉ. बडे, गोपलवाड, गलपवाड, फाजगे यांनी परिश्रम घेतले. विशेष म्हणजे पोलीसवाडीत आजपर्यंत एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही.

सॅनिटायझर फवारणी

बिलोली - बिलोली पासून ७ किमी. अंतरावरील बावलगाव येथे सॅनिटायझर फवारणी करण्यात आली. याकामी शिवकुमार पटणे व गंगाधर पाटील यांनी पुढाकार घेतला. यावेळी उपसरपंच रमेश छप्पेवार, ग्रामपंचायत सदस्य दत्ता पाटील, रामचंद्र ठोमसे, शिवराम ठोमसे आदी उपस्थित होते.

खानापूरला लस हवी

देगलूर - तालुक्यातील खानापूर लसीकरण केंद्रावर कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा जाणवत आहे. संबंधितांनी लस उपलब्ध करून द्यावी अशी मागणी होत आहे. लस नसल्याची माहिती नसल्याने अनेकजण लसीकरण केंद्रावर जाऊन परतत आहेत. खानापूर हे मध्यवर्ती ठिकाण असून परिसरातील नागरिक ही या ठिकाणी लसीकरणासाठी येत आहेत.

लाभार्थ्यांची मागणी

किनवट - सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या स्वस्त धान्य दुकानात गहू ऐवजी मका दिली जाते. मक्याचा दर्जा निकृष्ट असून त्याऐवजी गव्हाचा पुरवठा करावा अशी मागणी होत आहे. स्वस्त धान्य दुकानांमार्फत दर महिन्याला धान्याचा पुरवठा होतो. केंद्र सरकारने मे व जून महिन्यात मोफत धान्य देण्याचे आश्वासन दिले होते. त्यात गव्हाचा पुरवठा कमी करून मका देणे सुरू केले होते. मात्र मक्याचा दर्जा चांगला नाही.

गोरोबा काका पुण्यतिथी

लोहा - संत गोरोबा काका यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम रविवारी पार पडला. यानिमित्ताने अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेच्या वतीने शामराजे, राज्य युवक संपर्क प्रमुख श्रीराम तेलंग, नांदेड जिल्हा युवक अध्यक्ष बालाजी जोरुळे यांनी गोरोबा काका यांच्या प्रतिमेचे घरीच पूजन करावे, सार्वजनिक ठिकाणी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करू नये असे आवाहन केले होते.

सिडको, हडकोत फवारणी

नांदेड - शहर महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने सिडको हडको परिसरातील मुख्य बाजारपेठेसह अंतर्गत भागात निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली. क्रांती चौक, अण्णाभाऊ साठे चौक, छत्रपती शिवाजी चौक यासह मुख्य बाजारपेठेत फवारणी करण्यात आली. आरोग्य विभागाचे कर्मचारी बाबू गिरेवार, व्यंकट मगरे, राजेंद्र आढावे, राजू चव्हाण, संजय वाघमारे यांनी याकामी सहकार्य केले.

ग्रामीण भागात फळांना मागणी

मुदखेड - कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ बंद असली तरी ग्रामीण भागात हातगाड्यांवरील फळांना मागणी वाढत आहे. यामध्ये संत्री, मोसंबी, नारळ पाणी, अंगूर, सफरचंद, डाळिंब या फळांची विक्री वाढली. उन्हाच्या तीव्रतेनं टरबूज, खरबुजाची ही मागणी वाढली आहे.

कारागिरांवर उपासमार

नायगाव - कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मागील काही दिवसापासून आठवडे बाजार बंद पडले आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात मातीचे माठ तयार करून ते आठवडे बाजारात विक्री करणारे व्यावसायिक अडचणीत आले. त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

कारवाई ठप्प

हदगाव - मास्कचा वापर न करता फिरणाऱ्या नागरिकांवर केलेली जाणारी कारवाई आता ठप्प पडली आहे. नगरपालिकेचे पथक गायब झाले. अनेक नागरिक विनामास्क फिरत असल्याने कोरोनाचा धोका वाढला आहे.

डिझेल ही शंभरीच्या उंबरठ्यावर

नांदेड - जिल्ह्यात पेट्रोलच्या दराने पुन्हा एकदा शंभरी गाठली असून डिझेल ही शंभरीच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे वाहनधारकांना आर्थिक झळ सहन करावी लागत आहे. नागरिकांनाही त्याचा फटका बसत आहे.

इसम हरवल्याची नोंद

नायगाव - नायगाव तालुक्यातील बेंद्री येथील व्यंकटराव लक्ष्मण हणमंते (वय ४६) हे १५ एप्रिल २०२१ पासून गायब आहेत. हंगरगा येथे जातो म्हणून ते घराबाहेर पडले. ते आजपर्यंत घरी परतलेच नाहीत. नायगाव पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आहे.

सोयाबीन उगवण प्रात्यक्षिक

लोहा - तालुक्यातील सायाळ येथे प्रगतशील शेतकरी रत्नाकर पाटील ढगे यांच्या शेतात कृषी विभागाच्या वतीने सोयाबीन प्रात्यक्षिक उपक्रम राबविण्यात आला. कृषी सहाय्यक लक्ष्मण दुधाटे यांनी प्रात्यक्षिक करून दाखविले. शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणे उगवणशक्ती तपासल्याशिवाय पेरणी करू नये, शेतकऱ्यांनी घरची सोयाबीन बियाणे पेरणीस निवडावे असे आवाहन दुधाटे यांनी केले. यावेळी रत्नाकर पाटील, भगवान मोरताटे, प्रल्हाद ढगे, हिरामण मोरताटे, अच्युत ढगे, उत्तम ढगे आदी उपस्थित होते.