लोकमतचे संस्थापक संपादक स्व. जवाहरलालजी दर्डा आणि माजी केंद्रीय मंत्री स्व. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त शहरातील भक्ती लॉन्स येथे १४ जुलै रोजी आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मंचावर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम, प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष तथा माजी मंत्री नसीम खान, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, राजीव खांडेकर यांच्यासह काँग्रेसचे विधान परिषदेतील प्रतोद आमदार अमरनाथ राजूरकर, माजी पालकमंत्री डी. पी. सावंत, आ. मोहनअण्णा हंबर्डे, आ. माधवराव पाटील जवळगावकर, जि. प. अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, महापौर मोहिनी येवनकर, नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण, माजी आ. ईश्वरराव भोसीकर, माजी आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे, पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी युवक काँग्रेसच्या कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले, अशोकराव चव्हाणांची मान राज्यातच नव्हे, तर देशात उंचावली पाहिजे या उद्देशाने प्रेरित होऊन नांदेडची युवक काँग्रेस काम करीत असल्यानेच राज्यात नेहमीच क्रमांक एकवर राहते. आजच्या काळात सामाजिक विचारांच्या बांधीलकीतून राबविण्यात येत असलेल्या रक्तदान शिबिराचे त्यांनी कौतुक केले. दरम्यान, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनीही विचार मांडले.
प्रास्ताविक महनगर अध्यक्ष आ. अमरनाथ राजूरकर यांनी केले. जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष पप्पू कोंढेकर, युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष डॉ. विठ्ठल पावडे यांच्यासह काँग्रेसच्या सर्व विभागाच्या अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
चौकट.....
कोविड योद्धा म्हणून ‘लोकमत’चे काम...
नांदेडच्या सर्व यंत्रणांनी कोविड काळात खूच चांगले काम केले. कुठे ऑक्सिजन, तर कुठे बेडची कमतरता होती. परंतु, या काळात कोविड योद्धा म्हणून ‘लोकमत’ने जबाबदारीचे भान ठेवत काम केले. या काळात प्रशासन अन् शासनाला दिशा देण्याचे काम लोकमतने केले. त्याबद्दल अशोकराव चव्हाण यांनी लोकमतचा विशेष उल्लेख करीत आभार मानले. लोकमतकडून नेहमीच सामाजिक बांधीलकी जोपासली जाते. त्यात लोकमतने सुरू केलेली ही रक्तदानाची चळवळ निश्चितच लोकचळवळ होऊन लाखो रुग्णांचे प्राण वाचवू शकेल, असे चव्हाण म्हणाले.