हदगाव (जि. नांदेड) : शहरातील नाईकतांडा येथे लघूशंकेच्या कारणावरुन १९ सप्टेंबरच्या रात्री दोन गटांत हाणामारी होऊन कैलास मांजरे (३०) याचा जागीच मृत्यू झाला़ आरोपीला अटक करा, तरच उत्तरीय तपासणी करू, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतल्याने सुमारे १५ तास मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात पडून होते़नाईकतांडा येथील शंकर पवार हे घरासमोरील जागेत मंगळवारी रात्री लघूशंका करीत असताना कैलास मांजरे याने त्यास विरोध केला़ यावर शंकर पवार यांनी वाद घालण्यास सुरुवात केली़ वादाचे रुपांतर हाणामारीत झाले़ दोन्ही गटातीललोकांनी दगडे, लाठा-काठ्यांनी हाणामारी करण्यास सुरुवात केली़ यात प्रभू मांजरे, अंकुश मांजरे, शोभा मांजरे, सोनाली मांजरे, ज्योती मांजरेसह कैलास मांजरे जखमी झाला़ जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले़ तेथे कैलास याचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयीन सूत्रांनी स्पष्ट करताच तणाव निर्माण झाला. आरोपींनी भीतीपोटी तेथून पळ काढला़ पोलिसांनी फिर्याद घेऊन रात्री उशिरा या प्रकरणात आठ जणांवर गुन्हा नोंदविला़ मात्र आरोपींना तत्काळ अटक करा, अटक केल्याशिवाय आम्ही पी़एम़ करणार नाही व प्रेत ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका मृताच्या नातेवाईकांनी घेतल्याने तणाव वाढत गेला़या प्रकरणी हदगाव पोलिसांनी शेषराव मांजरे यांच्या फिर्यादीवरून आरोपी विष्णु पवार, शंकर पवार, विनोद पवार, विशाल पवार, सचिन पवार, संदीप पवार, पिंटू आडे, मोहन पवार (सर्व रा़नाईकतांडा, हदगाव) यांच्याविरूद्ध गुन्हा नोंदविला़
लघूशंकेच्या कारणावरून हदगावमध्ये खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 6:02 PM
हदगाव (जि. नांदेड) शहरातील नाईकतांडा येथे लघूशंकेच्या कारणावरुन १९ सप्टेंबरच्या रात्री दोन गटांत हाणामारी होऊन कैलास मांजरे (३०) याचा जागीच मृत्यू झाला़
ठळक मुद्दे१५ तास मृतदेह रुग्णालयात