शहरातून दोन दुचाकी चोरीला
नांदेड : शहरातील विमानतळ आणि नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन दुचाकी लंपास करण्यात आल्या आहेत. या प्रकरणात दोन्ही ठाण्यांत गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
जानकीनगर येथे खासगी अभियंता भगवान कारभारी यांनी एम.एच.२६ क्यू ९९८४ या क्रमांकाची दुचाकी उभी केली होती. १५ हजारांची ही दुचाकी लांबविण्यात आली. लातूर फाट्याजवळ देव दरबार हॉटेलच्या बाहेर असलेली शिवमंगल पुंडगे यांची २० हजार रुपये किमतीची एम.एच.२६, एबी ९०५८ ही दुचाकी लंपास करण्यात आली.
ऑटो खरेदीसाठी केला विवाहितेचा छळ
नांदेड : ऑटो खरेदी करण्यासाठी माहेराहून दोन लाख रुपये घेऊन येण्याच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ करण्यात आला. मागणी पूर्ण होत नसल्याने पीडितेला मारहाण करून घराबाहेर हाकलण्यात आले. या प्रकरणात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळींच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
एकाच प्लॉटची केली दोनदा विक्री
नांदेड : एकाच प्लॉटची दोन वेळेस वेगवेगळ्या व्यक्तींना विक्री करून फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
वाडी बु. शिवारातील प्लाॅट क्रमांक १७ सर्व्हे क्रमांक ३५, १ हा २०१२ मध्ये ज्योती जोगदंड यांना विक्री करण्यात आला होता. त्यानंतर तोच प्लॉट २०१६ मध्ये खोटे कागदपत्र तयार करून दशरथ पवार यांना विक्री करण्यात आला. ही बाब उघडकीस आल्यानंतर पवार यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून गुन्हा नोंद झाला.