लोणी : देगलूर तालुक्यातील जि़प़ व खाजगी अनुदानित शाळेतील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तकाचे वितरण करण्यात येणार आहे़ मराठी माध्यम १२ केंद्रात १४१ शाळा, मराठी सेमी माध्यम १५, शाळा उर्दू माध्यम ९ शाळेतील विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे़ शाळा सुरू करण्याआधीच देण्यात येणार आहे़तालुक्यात जि़प़शाळेच्या १४१ व खाजगी अनुदानित शाळा ५५ अशा १९६ शाळांना सर्व शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तकाचा लाभ मिळणार आहे़ इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना व विध्याथिनींना याचा लाभ मिळणार आहे़ मागणीनुसार मराठी माध्यम १ लाख २६ हजार २२२ पुस्तके प्रतिविषयनिहाय तीन माध्यमासाठी सेमी इंग्रजी माध्यमाच्या ५५११ प्रती व उर्दू माध्यम ७९८५ प्रती उपलब्ध झाले आहेत़ त्याचे वितरण २ जून रोजी करण्यात आले आहे़इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी चार विषयनिहाय प्रती दुसरीच्या विद्यार्थ्यांना चार विषयनिहाय प्रती, तिसरीसाठी पाच विषयनिहाय प्रती, चौथीच्या सहा विषयाच्या पाचव्या इयत्तेतील विद्यार्थ्यांना सहा विषयाच्या व सातव्या इयत्तेसाठी सात विषयाचे आणि आठवी इयत्तेतील विद्यार्थ्यांना सात विषयाचे पुस्तके वितरण करण्यात येणार आहेत़ शाळा प्रवेशदिनीच विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात येणार आहेत़१२ केंद्रावर वितरण२ ते १७ जून या कालावधीत पेठअमरापूर होट्टल, हाणेगाव, लोणी, भायेगाव, मानुर, माळेगाव चैनपुर, वन्नाळी, कावळगाव, नरंगल, आलूर या १२ केंद्रावर पुस्तके वितरण करण्यात येणार आहेत़गटशिक्षणाधिकारी राजकुमार जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली इतर कर्मचारी ही पुस्तके वाटप करणार आहेत़
शाळेच्या पहिल्या दिवशीच पुस्तके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2019 1:14 AM
देगलूर तालुक्यातील जि़प़ व खाजगी अनुदानित शाळेतील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तकाचे वितरण करण्यात येणार आहे़
ठळक मुद्देपहिली ते आठवी १९६ शाळांतील विद्यार्थ्यांना मिळणार नवी-कोरी पुस्तके