शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
2
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
3
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
4
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
5
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
6
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
7
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
8
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
9
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
10
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
11
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
12
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
14
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
15
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
16
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
17
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
18
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
19
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
20
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर

बालभारतीकडून पुस्तके रवाना; शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तकांचा सेट विद्यार्थ्यांना मिळणार

By रामेश्वर बालाजीराव काकडे | Published: May 17, 2024 6:50 PM

शासकीय, आश्रमशाळा, खासगी अनुदानित शाळा तसेच जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना दरवर्षी पाठ्यपुस्तके वितरित केली जातात.

नांदेड : समग्र शिक्षा अभियानांतर्गत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या जिल्ह्यातील तब्बल ३ लाख विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तके हातात पडतील, असे नियोजन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे. जिल्ह्यातील शासकीय, आश्रमशाळा, खासगी अनुदानित शाळा तसेच जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना दरवर्षी पाठ्यपुस्तके वितरित केली जातात. यंदाही शाळेच्या पहिल्या दिवशी म्हणजे १५ जूनला पुस्तके विद्यार्थ्यांच्या हाती पडावीत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 

जिल्ह्यात इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतचे १ लाख ८० हजार ३३६ इतके विद्यार्थी आहेत, तर इयत्ता सहावी ते आठवीपर्यंतचे १ लाख १७ हजार ७७४ विद्यार्थी संख्या आहे. अशी एकूण मिळून २ लाख ९८ हजार ११० विद्यार्थी संख्या आहे. सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वेळेवर मिळण्यासाठी नियोजन असल्याचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सविता बिरगे यांनी सांगितले. यावर्षी एकात्मिक स्वरूपात पाठ्यपुस्तके तयार करण्यात आली आहेत. एकाच संचामध्ये इंग्रजी, गणित यासह इतर विषय असणार आहेत. ही पुस्तके इंग्रजी माध्यमाच्या स्वंयअर्थसाहाय्यित शाळा सोडून इतर सर्व शाळांना वितरित केली जातील.

पाठ्यपुस्तकांसाठी १० कोटी ६७ लाखांची तरतूदजिल्ह्यात पहिली ते पाचवीसाठी १ लाख ४३ हजार ४९२ पुस्तकांचा संच तर इयत्ता सहावी ते आठवीपर्यंत १ लाख ३६ हजार ९७५ पुस्तकांचे एकात्मिक संच लागणार आहेत. यासाठी शासनाकडून १० कोटी ६७ लाख १५ हजार २३५ रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.

तालुकानिहाय विद्यार्थीसंख्याइयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतची तालुकानिहाय विद्यार्थी संख्या अशी-बिलोली ८६३९ विद्यार्थी, धर्माबाद ६६५२, नायगाव १०,४२५, देगलूर १२,६२७, नांदेड १०४५५, अर्धापूर ७३०५, मुदखेड ७७२७, किनवट १७१३४, माहूर ७७००, हदगाव १८२०८, हिमायतनगर ७२१०, मुखेड १८८२६, भोकर १० हजार ४०, उमरी ७३४२, कंधार १५३०६, लोहा १६२६० याप्रमाणे १ लाख ८० हजार ३३६ प्राथमिकची तर १ लाख १७ हजार ७७४ इयत्ता सहावी ते आठवीची विद्यार्थी संख्या आहे.

बालभारतीकडून नांदेडला रवानापाठ्यपुस्तकाचे संच लातूर येथील बालभारती कार्यालयातून नांदेड जिल्ह्यासाठी रवाना करण्यात आले आहेत. सदर पाठ्यपुस्तके वजिराबाद येथील मल्टिपर्पज हायस्कूलमध्ये उतरली जाणार आहेत. त्यानंतर पुस्तकांचे तालुकास्तरावर प्रत्येक शाळेत वाटप करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :NandedनांदेडEducation Sectorशिक्षण क्षेत्रSchoolशाळा