बिलोली : तालुक्यातील नांदेड-बिलोली राज्य मार्गावरील कासराळी येथिल हिंदुस्तान पेट्रोल पंपाजवळ दोन दुचाकीच्या समोरासमोरील धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य एक गंभीर झाल्याची घटना गुरुवारी ( दि.४ ) दुपारी १२.३० वाजेच्या दरम्यान घडली आहे.
नायगांव तालुक्यातील धुप्प येथिल पठाण गौस अब्दुलसाब (२५, दुचाकी क्र. ए.पी.२५ ए.एन.६२९९) व अन्य दुचाकीवरील बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी येथिल सिध्देश्वर विश्वनाथ स्वामी (५२ ) अशी मृतांची नावे आहेत. तर बोधन येथिल शेख फरीद शेख खमरोद्दीन ( २१ ) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर बिलोली ग्रामीण रुग्णालयात वैद्यकिय अधिकारी डॉ.सतीश तोटावार यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेडकडे रवाना केले. दरम्यान, या मार्गावर मागील ३ वर्षात अपघातात ४६ जणांचा मृत्यू झाला आहे.