नांदेड : भाजपाने मुंडे कुटुंबाला खूप काही दिले. याची जाणीव आमदार पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यांना आहे. त्यामुळे पंकजा मुंडे कोणताही चुकीचा निर्णय घेतील, असे आपल्याला वाटत नाही, असे मत शिवसंग्राम संघटनेचे नेते आमदार विनायक मेटे आज व्यक्त केले. तसेच खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रीपद न मिळाल्याने त्यांच्या समर्थकांनी राजीनामे दिले. पण त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे राजीनामे द्यावे, तरच ते स्वीकारले तरी जातील, अशी प्रतिक्रिया देत आ. मेटे यांनी मुंडे यांच्याकडून राजीनामासत्र नाट्य सुरू असल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितले. ( Both sisters are aware that BJP has given a lot to Munde family, says Vinayak Mete )
देगलूर- बिलोली विधानसभा मतदार संघात शिवसंग्रामच्या माध्यमातून सुरेखा पुणेकर यांनी भाजपकडे उमेदवारी मागितली आहे. यानिमित्ताने मेटे यांनी नांदेड दौरा केला असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रत्येक समाजाला प्रतिनिधीत्व मिळाले पाहिजे, अशी भूमिका मांडली. त्यांच्या समवेत शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, सचिन पाटील हिवराळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार मेटे यांनी राज्य सरकारवर सडकून टिका केली. ते म्हणाले, तत्कालिन मुख्यमंत्री फडणविस यांनी मराठा समाजाला दिलेले आरक्षण उद्धव ठाकरे सरकारला टिकवता आले नाही. त्यांनी न्यायालयात चुकीची कागदपत्रे सादर केल्याचा आरोपही मेटे यांनी केला. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठा समाजाच्या प्रश्नाबद्दल राज्य सरकारला मार्गदर्शन केले नाही. हे मराठा समाजाचे दुर्देव असल्याची टीका आमदार विनायक मेटे यांनी केली. मराठा समाजाला आरक्षण देण्याची त्यांची इच्छा आहे की नाही मला माहित नाही. पण सरकार ज्या पद्धतीने मराठा आरक्षणावर भूमिका घेत आहे. त्यावरून मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची भूमिका नाही, असे स्पष्ट दिसत असल्याची टीका त्यांनी केली.
समाजाचे प्रश्न चुकीच्या पद्धतीने हाताळलेराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठा समाजाच्या प्रश्नाबद्दल राज्य सरकारला मार्गदर्शन केले नाही. हे मराठा समाजाचे दुर्देव असल्याची टीका आमदार विनायक मेटे यांनी केली. आजघडीला सरकारकडून सर्वच समाजाचे प्रश्न चुकीच्या पद्धतीने हाताळले जात आहेत. आघाडी सरकारकडून जातीय राजकारण सुरू आहे. कोणत्याही समाजाला न्याय देण्याची भूमिका सरकारची नाही. त्यात मराठा आरक्षण न्यायालयात न टिकण्यास आघाडी सरकारच जबाबदार असून मराठा आरक्षण समिती कुचकामी ठरल्याची टीका ही त्यांनी केली.