नांदेड : पंचायत समिती सभापतीसह सदस्यांना पूर्वीप्रमाणे अधिकार देण्यात यावे, या मागणीसाठी शनिवारी नांदेडपंचायत समितीच्या मासिक सभेवर सभापतीसह इतर सदस्यांनी बहिष्कार टाकला. अधिकारासाठी सभेवर बहिष्कार टाकण्याची ही पहिलीच वेळ आहे.नांदेड पंचायत समितीच्या मासिक सभेचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. पंचायत समितीचे अधिकार दिवसेदिवस काढून घेतले जात आहे. त्यामुळे बैठका घेवून करायचे काय? असा सवाल पं.स. सभापती सुखदेव जाधव यांनी उपस्थित करत मासिक सभेला बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला उपसभापतीसह इतर सदस्यांनी पाठिंबा दिला. पंचायत समिती सदस्यांना १४ व्या वित्त आयोगातून पूर्वीप्रमाणेच निधी द्यावा, जिल्हा नियोजन समितीमध्ये सभापतींना सदस्य म्हणून घ्यावे, पं.स. सभापती व सदस्यांच्या मानधनात वाढ करावी, स्थानिक स्वराज्य संस्था (विधान परिषद) निवडणुकीसाठी मतदान करण्याचा अधिकार द्यावा. त्याचवेळी पं. स. सदस्यास विकास कामे करण्यासाठी ५० लाख रुपयापर्यंतचा निधी उपलब्ध करुन द्यावा, सार्वजनिक व वैयक्तिक लाभांच्या योजनेची मान्यता देण्याचा अधिकार पंचायत समिती सभागृहाला देण्यात यावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांनाही देण्यात आल्या आहेत. यावेळी सभापती सुखदेव जाधव, उपसभापती शेख हसिना बेगम, पं.स. सदस्य प्रभू इंगळे, अॅड. राजू हटकर, गंगाधर नरवाडे, शुभलक्ष्मी सूर्यवंशी, कावेरी वाघमारे, अनिता गर्जे आदींची उपस्थिती होती.
सदस्यांचा बैठकीवर बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 12:31 AM
पंचायत समिती सभापतीसह सदस्यांना पूर्वीप्रमाणे अधिकार देण्यात यावे, या मागणीसाठी शनिवारी नांदेड पंचायत समितीच्या मासिक सभेवर सभापतीसह इतर सदस्यांनी बहिष्कार टाकला. अधिकारासाठी सभेवर बहिष्कार टाकण्याची ही पहिलीच वेळ आहे.
ठळक मुद्देपूर्वीप्रमाणे अधिकार देण्याची मागणी