शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

औषधींचा पुरवठा करणाऱ्या हाफकिनचा करार तोडला; पर्यायी व्यवस्थाही कुचकामी

By प्रसाद आर्वीकर | Updated: October 6, 2023 20:26 IST

सरकारी रुग्णालयातील या मृत्यूच्या प्रकरणाने औषधींचा तुटवड्याचा प्रश्न प्रखरतेने दिसू लागला आहे.

नांदेड : सरकारी वैद्यकीय महाविद्यालये आणि राज्यातील सरकारी दवाखान्यांना औषधींचा पुरवठा करणाऱ्या हाफकिन या संस्थेशी असलेला करार तीन वर्षांपूर्वीच तोडला आहे. त्यानंतर पर्यायी यंत्रणा उभारली. मात्र, त्यात अनेक त्रुटी ठेवल्याने औषधींसाठी सरकारी रुग्णालयांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रुग्णांच्या जिवाशी खेळ सुरू असताना शासकीय यंत्रणा मात्र या प्रकारावर पांघरून टाकण्यातच धन्यता मानत असल्याने सध्या रोष व्यक्त होत आहे.

येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात तीन दिवसांमध्ये ५५ रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर औषधी पुरवठ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या रुग्णांचा मृत्यू औषधींअभावी झाला की अन्य कोणत्या कारणाने, ते चौकशीअंती समोर येईलच. परंतु सरकारी रुग्णालयातील या मृत्यूच्या प्रकरणाने औषधींचा तुटवड्याचा प्रश्न प्रखरतेने दिसू लागला आहे. तीन  दिवसांपासून शासकीय रुग्णालयातील यंत्रणा अलर्ट झाली आहे. या काळात सरकारी रुग्णालयांना भेट दिली असता, रुग्णांना बाहेरून औषधी आणायला लावली जाते, हे मात्र समोर आले आहे. त्यामुळे सरकारी रुग्णालयांना मुबलक प्रमाणात औषधी पुरवठा होत नसल्याचेच दिसत आहे.

याच अनुषंगाने औषधी पुरवठ्यासंदर्भात माहिती घेतली असता, औषधींचा तुटवडा असल्याच्या बाबीला प्रशासकीय यंत्रणेने दुजोरा दिला. मात्र, कोणीही पुढे येऊन बोलण्यास तयार नाही. सरकारी दवाखान्यांना औषधी पुरवठा करणाऱ्या हाफकिन या संस्थेसोबत असलेला करार शिंदे- फडणवीस यांचे सरकार सत्तेत आल्यानंतर रद्द करण्यात आला. त्यामुळे या संस्थेकडून रुग्णालयांना औषधी पुरवठा होत नाही. राज्य शासनाने औषध निर्माण प्राधिकरणाची स्थापना करून त्याद्वारे औषधी पुरवठ्याचा निर्णय घेतला. मात्र, या प्राधिकरणातही अनेक त्रुटी आहेत. राज्य शासनाने या संस्थेसाठी निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांचीच पदे रिक्त ठेवली आहेत. त्यामुळे औषधींचा पुरवठा वेळेत आणि मुबलक प्रमाणात होत नाही. परिणामी, सध्या सरकारी रुग्णालयांना औषधींचा तुटवडा जाणवत असून, बाहेरून औषधी मागवावी लागत आहे.

रुग्णांनाच आणावी लागते औषधीसरकारी रुग्णालयांमध्ये औषधी उपलब्ध नसल्याने काही औषधी रुग्णांनाच स्वत: खरेदी करावी लागते. गेल्या दोन दिवसांत विष्णुपुरी येथील सरकारी रुग्णालयात पाहणी केली असता, अनेक रुग्णांना खासगी औषधी दुकानावरून औषधी खरेदी करावी लागत असल्याचे दिसून आले. ग्रामीण भागातील उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयांतील स्थितीही यापेक्षा वेगळी नाही.

नुसताच निर्णय; औषधी खरेदी बाहेरूनसर्व शासकीय रुग्णालयातील तपासणी, औषधी आणि शस्त्रक्रिया पूर्णत: मोफत करण्याचा निर्णय राज्य शासनाने १५ ऑगस्ट रोजी घेतला. मात्र, प्रत्यक्षात सरकारी रुग्णालयातच औषधी उपलब्ध नसल्याने घोषणा झाल्यानंतरही रुग्णांच्या नातेवाईकांना खासगी दुकानावरून औषधी खरेदीसाठी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

औषधींसाठी होते ३० टक्केच खर्चाचे अधिकार शासनाच्या नियमानुसार औषधी खरेदीसाठी निश्चित केलेल्या तरतुदीतील केवळ ३० टक्के रकमेतून स्थानिक पातळीवर औषधी खरेदी करता येते. उर्वरित ७० टक्के रकमेतून राज्य स्तरावरून हाफकिन किंवा अन्य संस्थेद्वारे औषधी खरेदीचे अधिकार आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर ३० टक्के रकमेतून औषधींची खरेदी केली जाते.

टॅग्स :Nandedनांदेडhospitalहॉस्पिटल