लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजना नागरी प्रकल्प क्रमांक २ च्या वतीने स्तनपान व शिशुपोषण या विषयावर जनजागृती करण्यासाठी शहरातून रॅली काढण्यात आली़ यामध्ये सातशेहून अधिक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची उपस्थिती होती़शहरातील शारदानगर येथून रॅलीस महापौर शैलजा स्वामी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरूवात करण्यात आली़ यावेळी महिला व बालकल्याण सभापती डॉ़शीला कदम, शिक्षणाधिकारी दिलीपकुमार बनसोडे, बालविकास प्रकल्प अधिकारी प्रकल्प क्रमांक ३ चे शेख अब्दुल रशीद यांची प्रमुख उपस्थिती होती़सभापती डॉ़ शीला कदम म्हणाल्या, स्तनपान हे बाळाचे पहिले लसीकरण असून तो बाळाचा पहिला आहार आहे़ बाळाच्या उत्तम आरोग्यासाठी ते जन्मल्यानंतर पहिल्या अर्ध्या तासाच्या आत त्याला आईचे दूध देणे आवश्यक आहे़महापौर स्वामी म्हणाल्या, बालकाच्या पहिल्या दोन वर्षांत आईच्या दुधाला अनन्यसाधारण महत्व असून प्रत्येक बाळाला ते दिले गेले पाहिजे़ रॅलीच्या आणि सप्ताहाच्या माध्यमातून जनतेने हा निश्चय करावा, असे आवाहन स्वामी यांनी केले़ शहरातील शारदानगर येथून सुंदरनगर, शोभानगर, पीरबुºहाणनगर, अशोकनगर, भाग्यनगर, आनंदनगर, जिजाऊनगर मार्गे रॅली काढली़ रॅलीदरम्यान अंगणवाडीसेविका आणि मदतनीस यांनी स्तनपानाविषयी आणि आईचे दूध बाळाला किती आवश्यक आहे, याबाबत घोषणा देण्यात आल्या़
स्तनपान सप्ताहानिमित्त शहरात रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 12:11 AM