जिल्हाभरात जवळपास २ लाख १५ हजार कनेक्शन उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत गरीब कुुटुंबीयांना देण्यात आले आहेत. मात्र सिलिंडरचे दर आता ८५० रुपयांपर्यंत पोहोचले असल्याने हे पैसे आणायचे कोठून, असा प्रश्न गरीब कुटुंबीयांना पडला आहे. त्यामुळे पुन्हा चुलीवर स्वयंपाक करणे हाच पर्याय उरला आहे.
गेल्या दीड ते दोन वर्षांपासून कोरोनामुळे सर्व व्यवहार ठप्प पडले आहेत. त्यात गॅसचे दर वरचेवर वाढत आहेत. यामुळे महिलांचे गणित बिघडले आहे.
- सविता नरवाडे, नांदेड
अच्छे दिनचे स्वप्न दाखवून देशात मोदी सरकार सत्तेवर आले. मात्र प्रतिदिन पेट्रोल आणि गॅस सिलिंडरची दरवाढ होत आहे. कुटुंबीयांना जगवायचे कसे, हाच प्रश्न आहे.
- जयश्री सावते, नांदेड
सामान्य माणसाला आता कोरोना संकटात जगणे अवघड झाले आहे. सरकारकडूनही महागाई कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत.
- विमलबाई वाघमारे, नांदेड