शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड अँड सिल्वर कप हॉकी स्पर्धेत बीएसएफ जालंधर विजयी 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2017 4:48 PM

श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड अँड सिल्वर कप हॉकी स्पर्धेच्या शेवटच्या सामन्यात बॉर्डर सेक्युरिटी फोर्स जालंधर संघाने प्रथम स्थान पटकावत सुवर्ण चषकावर स्वत:चं नाव कोरलं. तर सर्वश्रेष्ठ खेळ करत नाशिक संघाला दुसर्‍या पारितोषिकांवर समाधान मानावे लागले. तर तिसर्‍या स्थानी नॉर्थन रेल्वे दिल्ली संघाने स्थान निश्चित केले. 

नांदेड : श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड अँड सिल्वर कप हॉकी स्पर्धेच्या शेवटच्या सामन्यात बॉर्डर सेक्युरिटी फोर्स जालंधर संघाने प्रथम स्थान पटकावत सुवर्ण चषकावर स्वत:चं नाव कोरलं. तर सर्वश्रेष्ठ खेळ करत नाशिक संघाला दुसर्‍या पारितोषिकांवर समाधान मानावे लागले. तर तिसर्‍या स्थानी नॉर्थन रेल्वे दिल्ली संघाने स्थान निश्चित केले. 

दोन्ही संघांना आशीर्वाद देण्यासाठी संतबाबा बलविंदरसिंघजी आवर्जूनपणे उपस्थित होते. नांदेडचे जिलाधिकारी अरुण डोंगरे, आ़डी.पी. सावंत, आ़अमरनाथ राजूरकर,  उपमहापौर विनय गिरडे पाटील, मनपा सभागृह नेते विरेंदरसिंघ गाडीवाले, माजी महापौर अब्दुल सत्तार, अब्दुल शमीम, डी. पी. सिंघ, तहनसिंग बुंगाई नगरसेवक अमित सिंह तेहरा, आनंद चव्हाण, प्रकाश कौर खालसा, श्रीनिवास जाधव, गुरमितसिंघ नवाब यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले. आ. अमरनाथ राजूरकर यांनी आणि आ़डी.पी. सावंत यांनी आमदार निधीतून दोन-दोन लाख दिल्याचे जाहीर करून पुढच्या वर्षी तीन लाख निधी देण्याचे घोषित केले. 

आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल उभारण्यासाठी प्रयत्न व्हावेत या वेळी जिलाधिकारी अरुण डोंगरे खेळाडूंना आणि उपस्थितांना उद्देशून म्हणाले, नांदेड मध्ये मागील अनेक वर्षा पासून हॉकी खेळासाठी क्रीडा संस्था पुढाकार घेत आहेत हि बाब राष्ट्रीय खेळ हॉकीला जिवंत ठेवण्यासाठी प्रेरक ठरली आहे. हॉकी आपला राष्ट्रीय खेळ असल्याने सर्वांनी हॉकी साठी पुढाकार घ्यायला हवे. श्री गुरु गोबिंद सिंघजी यांच्या जन्म शताब्दी साठी १५० कोटी मिळणार आहेत त्यातून हॉकी टर्फ किंवा हॉकीचे वेगळे आंतरराष्ट्रीय स्टेडियम होऊ शकतो जर गुरुद्वारा बोडार्ने सकारात्मक भुमीका घेतल्यास ते कार्य पूर्ण होऊ शकते. मागे बोर्ड पदाधिका-यांची बैठक घेऊन आम्ही वरील बाबत प्रस्ताव दिला होता. पुढे मार्ग काढण्यात येईल. असे हि जिल्हाधिकारी म्हणाले. 

डी.पी. सावंत यांनी आपल्या भाषणात क्रीडा क्षेत्राचे विकास आवश्यक असल्याचे सांगत, नांदेड मध्ये भौतिक सुविधांची निनांत गरज आहे. जर सुविधां उपलब्ध नसतील तर आंतरराष्ट्रीय स्तराचे खेळाडू येथे येणार नाही, त्या करीता भौतिक सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न व्हावेत असे सांगितले. आमदार निधीतून मी पाच लाखांची निधी खेळासाठी देतो. चांगले खेळाडू नांदेड मध्ये व्हावे आणि त्यांच्या द्वारे नांदेडचे नाव लौकिक व्हावे अशी अपेक्षा त्यांनी केली. 

आमदार राजूरकर यांनी क्रीडा स्पधेर्ला ४५ वर्षे पूर्ण झाल्या मुळे शुभेच्छा दिल्या. तसेच दोन लाखांची आमदार निधी श्री गुरु गोबिंदसिंघजी स्पर्धेसाठी देण्याचे घोषित केले. तसेच पुढच्या वर्षी आमदार निधी वाढवून ३ लाख करण्याची घोषणा हि त्यांनी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. जुंझारसिंग शिलेदार यांनी केले तर जसपालसिंघ काहलों आणि खेमसिंघ यांनी संचालन केले. गुरमितसिंघ नवाब यांनी आभार मानले. उपाध्यक्ष जितेंदरसिंघ खैरा, सचिव हरविंदरसिंघ कपूर, कोषाध्यक्ष हरप्रीतसिंघ लांगरी, सहसचिव संदीपसिंघ अखबारवाले, सदस्य महिन्दरसिंघ लांगरी, जसपालसिंघ काहलों, अमरदीपसिंघ महाजन, जसबीरसिंघ चिमा, विजय नंदे, दीपसिंग फौजी यांनी अतिथींचे सत्कार केले. 

अंतिम सामन्याचा थरार

अंतिम सामना एक-एक गोल ने बरोबरीवर सुटल्याने शूटआऊट प्रणालीने निकाल काढण्यात आले. ४ विरुद्ध ३ अशा गोल अंतराने बीएसएफ जालंधरने सडेन डेथ मध्ये सामना जिंकला. बीएसएफ तर्फे कव्हरपालसिंघने गोल केला. तर नासिक तर्फे बुध्दराम धोंधारी याने गोल केला. 

तिस-या स्थानासाठी नॉर्थन रेल्वे दिल्ली विरुद्ध कर्नाल हॉक्स हरियाणा संघात खेळ झाला.दोन्ही संघांनी एक - एक गोल करत बरोबरी साधली. दिल्ली तर्फे सुखमंत सिंघ ने गोल केला. तर कर्नाल तर्फे राहुल ने गोल केला. म्हणून शूटआऊट प्रणाली द्वारे निर्णय काढणायत आले. यात दिल्ली संघाने ४ विरुद्ध ३ गोलने सामना जिंकला. पंच म्हणून राजकुमार झा, प्रेयस के.जी. , मोहंमद रिझवान, इंदरपाल सिंघ, दर.खालिद हुसेन, प्रदीप एम.जी.पी. यांनी पहिले. प्रथम पारितोषिक एक लाख रुपये नगदी आणि गोल्ड कप देण्यात आले. दुसरे पारितोषिक ४१ हजार रुपये नगद आणि सिल्वर ट्रॉफी, तिसरे पारितोषिक ११ हजार आणि ट्रॉफी देण्यात आले. हजारोच्या संख्येत प्रेक्षक सामन्याचे आनंद घेण्यासाठी उपस्थित होते़.

टॅग्स :Nandedनांदेड