शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
2
मुख्यमंत्रि‍पदावरून नाराज असल्याची चर्चा; आमदारांबाबत एकनाथ शिंदेंनी उचललं महत्त्वाचं पाऊल
3
चांगल्या कामासाठी मराठी माणसं एकत्र येणं चांगलेच; आमदार महेश सावंत यांचं विधान
4
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
5
LIC नं सप्टेंबर तिमाहित केली ३८००० कोटींच्या शेअर्सची विक्री, तुमच्याकडे आहेत का ‘हे’ स्टॉक्स?
6
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट, राज्यातील या २३ जिल्ह्यांत फोडता आला नाही भोपळा
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
8
वॉरेन बफेट यांनी आपला उत्तराधिकारी ठरवला, दान केले १.१ अरब अमेरिकी डॉलरचे शेअर
9
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
11
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
12
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
13
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
14
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
15
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
16
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
17
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीत न जाता भाजपसोबत जाणे ही चूक; राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांची नाराजी
19
फेअर प्ले आयपीएलप्रकरणी मुंबई, ठाण्यासह  २१९ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
20
निवडणूक संपताच KDMC तील २ हजार कुटुंबांचे वास्तव्य धोक्यात; सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट

कामारीमार्गे बससेवा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2021 4:13 AM

वसंतराव नाईक जयंती देगलूर : कै. बापुसाहेब एकंबेकर ग्रामीण महाविद्यालयात १ जुलै रोजी माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांची ...

वसंतराव नाईक जयंती

देगलूर : कै. बापुसाहेब एकंबेकर ग्रामीण महाविद्यालयात १ जुलै रोजी माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. उत्तम मानवते, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अशोक साबणे होते. सूत्रसंचालन प्रा. शीला कांबळे यांनी केले. प्रा. पवन एमेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी डॉ. हंगरगेकर, मारोती चव्हाण, अनिल मचपुरी, आदींनी परिश्रम घेतले.

जिल्हा उपाध्यक्षपदी बाभळीकर

हदगाव : राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी डॉ. देवराव पाटील बाभळीकर यांची निवड जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांनी केली. यावेळी तालुकाध्यक्ष वसंतराव देशमुख, हिमायतनगरचे सुनील पतंगे, सरदारखान, उत्तमराव तावडे, अमोल कदम, विनायक क्षीरसागर, शफी पटेल, राजेश माने, गणपत हुलकाने, राजू कदम, आदी उपस्थित होते.

घनवन लागवडीचे उद्घाटन

हदगाव - वनपरिक्षेत्र हदगावमधील पळसा येथे राखीव वनात आनंदवन घनवन लागवडीचे उद्घाटन करण्यात आले. या लागवडीत ३३ हजार रोपांची लागवड होणार आहे. कार्यक्रमाला आ. माधवराव पाटील जवळगावकर, वनपरिक्षेत्र अधिकारी शरयू रुद्रावार, मनाठ्याचे सपोनि विनोद चव्हाण, माजी नगराध्यक्ष अमित अडसुळ, मनोज लद्दे, वनपाल एस. सालमेटी, वनरक्षक नितीन चव्हाण, आदी उपस्थित होते.

बंधाऱ्याचे बांधकाम अर्धवट

किनवट : पैनगंगा नदीवर उच्च पातळीवर बंधारा मंजूर होऊन कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. दहा वर्षांपासून बंधाऱ्याचे काम अर्धवट आहे. या बंधाऱ्यास दरवाजे असून, ते धूळ खात पडले आहेत. जेवढे बांधकाम झाले, त्यापेक्षा अधिक बांधकामाची रक्कम गुत्तेदारांनी उचल केली. बांधकामाची वाळू, गिट्टी, इतर साहित्य चोरीस जात आहे.

विजेच्या धक्क्याने बैल दगावला

लोहा : जोमेगाव, ता. लोहा येथील मोहन शिंदे यांच्या बैलाचा विजेच्या धक्क्यामुळे मृत्यू झाल्याची घटना २ जुलै रोजी सकाळी घडली. ऐन पेरणीच्या दिवसांत शिंदे यांना नुकसान सहन करावे लागत आहे.

मोबाईल लंपास

मुक्रमाबाद : तालुक्यातील दापका गुंडोपंतमधील ६० वर्षीय आजीचा मोबाईल लांबविण्यात आल्याची घटना ३ जुलै रोजी घडली. मुक्रमाबाद पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली. आरोपी बबन गडीकर हा ओळखीचा असल्याने आजीबाईने त्याला चहापाणी केले. या महाभागाने चहा तर पिलाच, शिवाय आजीचा मोबाईल घेऊनही पलायन केले. आजीबाई राजाबाई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुक्रमाबाद पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली.

दुबार पेरणीचे संकट

हदगाव : तालुक्यातील तामसा परिसरात शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. पावसाअभावी शेतकरी संकटात सापडला. परिसरातील दिग्रस, लोहा, पिंपराळा, आष्टी, कंजारा, लाव्हा, खरटवाडी, केदारनाथ, पाथरड, घोगरी, आदी गावांतील शेतकऱ्यांनी पावसाच्या भरवशावर पेरण्या उरकल्या. मात्र, पावसाने दगा दिल्यामुळे शेतकऱ्यांना आता डोक्यावर हात मारण्याची वेळ आली.

४४ हजारांची चोरी

लोहा : शहरातील महावितरण कार्यालयाच्या गोदामातून ४४ हजार ५०० रुपयांचा माल लांबविण्यात आला. ५ ते २९ जूनच्या दरम्यान ही घटना घडली. या प्रकरणी उपअभियंता आर. डब्ल्यू. जांभळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

अर्धापुरात वृक्षलागवड

अर्धापूर : भारतीय स्टेट बँकेच्या वर्धापनदिनानिमित्त अर्धापूर शाखेच्या वतीने वृक्षलागवड उपक्रम राबविण्यात आला. यावेळी शाखाधिकारी सुनील घुगूल, डॉ. विनोद जाधव, मुख्याध्यापक रवींद्र जिल्हावार, उपमुख्याध्यापक शिवानंद दासे, वैजनाथ कामठेकर, भूजंग दासे, रवींद्र दासे, शिवराज दासे, विजय वाहूळकर, नारायण साखरे, केशव बेंबळगे, आदी उपस्थित होते.

विषबाधेमुळे मृत्यू

नायगाव : देगाव शिवारातील पळसगाव येथे मैनोद्दीन पिंजारी (वय ४९) या शेतकऱ्याचा फवारणीदरम्यान विषबाधा झाल्याने मृत्यू झाल्याची घटना ३ जुलै रोजी दुपारी घडली. तोंडाला व हाताला काहीच सुरक्षित बांधून घेतले नसल्याने ही घटना घडली. कुंटूरचे बीट जमादार अब्दुल बारी, इश्वरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मजुरांच्या हाताला मिळेना काम

नांदेड : जिल्ह्यातील विविध ठिकाणची शासकीय कामे रखडल्याने मजुरांच्या हाताला काम मिळेनासे झाले आहे. वाळूचे भाव वाढल्यानेही बांधकामाला अडचण निर्माण होत आहे. अनेक मजुरांची नोंदणी कामगार कार्यालयाकडे झाली नसल्याचेही शासनाच्या योजनेचा त्यांना लाभ मिळत नाही. त्यामुळे मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे.