नांदेड शहरातील प्लाॅटवर ताबा सांगून प्लाॅट बळकावण्याच्या घटना घडत असताना, आता किरायेदारांकडून घरमालकांना टार्गेट केले जात आहे. त्यात सर्वाधिक दावा करणारे जवळचे नातेवाईक अथवा वर्षानुवर्षे त्याच घरात, दुकानात राहणारे किरायेदार आहेत. या प्रकरणात गुन्हे दाखल होऊन मूळ मालकांना ताब मिळत नाही.
घर भाड्याने देताना ही घ्या काळजी...
किरायेदार ठेवताना तो कुठला आहे, त्याचे चारित्र्य, घरात राहणारे सदस्य आदी माहिती घ्यावी.
आधारकार्ड व इतर कागदपत्रे पडताळून ११ महिन्यांचा करारनामा करून घ्यावा
अनोळखी भाडेकरू असेल, तर त्याची माहिती संबंधित पोलीस ठाण्यालाही द्यावी
प्लाॅटवरही कब्जा
गुंतवणूक म्हणून प्लाॅट घेऊन ठेवलेले अनेकजण त्याकडे वर्षानुर्षे फिरकत नाहीत.
अशा ठिकाणी काही उपद्रवी लोकांकडून झोपडी अथवा विटा रचून तात्पुरते घर केले जाते.
त्यानंतर या जागेवर स्वत:चा ताबा सांगून मालकीचाही दावा केला जातो.
अशा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे प्लाॅटमालकांनी वेळीच सजग व्हावे.
प्लाॅट महापालिकेत अथवा ग्रामपंचायतीच्या नोंदीला आपल्या नावे लावून घ्यावा.