या उपक्रमाचा पुरेपूर वापर होणे क्रम प्राप्त असल्याने पोषण अभियानांतर्गत सुरू असलेल्या जन आंदोलनाच्या उपक्रमांना अधिक चालना मिळेल. ऑडिओ, व्हिडिओ मेसेजेस पुस्तिका इत्यादी प्रसार व प्रचार करण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती बालविकास अधिकारी विशालसिंह चौहान यांनी दिली आहे. यामध्ये गरोदरमाता, स्तनदामाता, बाळाची काळजी, पाककृती, बाल संगोपन संबंधित खेळ इत्यादी माहिती कॉलवर सूचित केल्याप्रमाणे वेगवेगळे अंक पाठवून ऐकू शकतात. मेसेज प्राप्त करू शकतात. व्हाॅट्सॲप चाट बाट लाभार्थींना मोबाइल नंबरला सेवा जतन करून व्हाॅट्सॲपवर संवाद साधायचा आहे. सुरुवातीला हाय, हॅलो, नमस्ते इत्यादी पाठवून संवादास सुरुवात करायची आहे. त्यानंतर नाव नोंदवून सूचित केल्याप्रमाणे अंक पाठवून या व्हाॅट्सॲपसोबत संवाद करू शकता. हा चाट एखाद्या व्यक्तीप्रमाणे लाभार्थी सोबत संवाद करणार आहे. ब्राॅड कास्ट काॅल लाभार्थीचे आय.सी.डी.एस. व सी.एस.मध्ये उपलब्ध मोबाइल नंबरचा उपयोग करून लाभार्थीनिहाय म्हणजे गरोदरमातांना तिमाही प्रमाणे, बालकांच्या वयानुसार त्यांच्या पालकांना राज्यस्तरावरून कॉल केला जाईल. त्यामध्ये त्यांच्याशी निगडित पोषण व आरोग्य संबंधित माहिती सांगण्यात येईल. ‘एसएमएस’द्वारे आयव्हीआर हेल्पलाइन नंबर व व्हाॅट्सॲपची माहिती देण्यात येईल, तर एक घास मायेचा यू-ट्यूब लिंकवर गरोदरमाता, स्तनदामाता व ६ महिने ते २ वर्षे बालकासाठी विशेष पौष्टिक रेसिपी पाककृती स्वच्छतेच्या सवयी व बाळाला कसे खाऊ घालावे? यासंबंधी माहिती मिळेल. आजीबाईच्या गुजगोष्टी या लिंकवर आजीबाईच्या गुजगोष्टींद्वारे स्तनपान व पूरक आहार याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न आहे, असेही चौहान यांनी सांगितले.
तरंग सुपोषित महाराष्ट्राचा या अभियानास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2021 4:54 AM