नांदेड : सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असून त्यासाठी शिक्षक, शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत़ यातील अनेकजण निवडणुकीच्या कामातून आपली सुटका कशी होईल यासाठी प्रयत्न करीत आहेत. देगलूर तालुक्यात तर एका शिक्षकाने इलेक्शन ड्युटी रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे चिठ्ठी लिहून विष प्राशन करण्याची धमकी दिली़ या प्रकरणी शिक्षकावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे़लोकसभा निवडणुकीत येत्या १८ एप्रिल रोजी मतदान घेण्यात येणार आहे़ त्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरु आहे़ मतदान केंद्रावर शासकीय अधिकारी, शिक्षक यासह इतर कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे़त्यांना मतदानापूर्वीचे प्रशिक्षणही देण्यात येत आहे़ परंतु निवडणुकीच्या या कामातून सुटका करवून घेण्यासाठी अनेकांनी फिल्डिंग लावली आहे़ काही कर्मचारी तर अफलातून कारणे देत आहेत़ परंतु देगलूर तालुक्यात वेगळाच प्रकार पहावयास मिळाला़ अशोक हणमंतराव देशमुख (रा़ हावरगा) या शिक्षकाची निवडणुकीच्या कामासाठी नियुक्ती करण्यात आली होती़दरम्यान, ११ एप्रिल रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास देशमुख यांनी फोनवरुन तहसीलदार अरविंद बोळगे यांच्याशी संपर्क साधला़ माझी इलेक्शन ड्युटी रद्द न केल्यास तहसीलदार आणि जिल्हाधिकाºयांच्या नावे चिठ्ठी लिहून विष प्राशन करणार असल्याची धमकी दिली़ ही बाब तहसीलदार बोळगे यांनी पोलिसांना कळविली़ त्यानंतर पोलिसांनी शिक्षकाला ताब्यात घेत वैद्यकीय तपासणी केली़ या प्रकरणी देगलूर पोलीस ठाण्यात लोकप्रतिनिधी अधिनियमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे़
इलेक्शन ड्युटी रद्द करा, अन्यथा आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 12:18 AM
सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असून त्यासाठी शिक्षक, शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत़ यातील अनेकजण निवडणुकीच्या कामातून आपली सुटका कशी होईल यासाठी प्रयत्न करीत आहेत.
ठळक मुद्देशिक्षकाची धमकी : गुन्हा दाखल