अनुराग पोवळे।नांदेड : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये आता रंगत येत असून १८ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानासाठी प्रचारही वेगात सुरु आहे. या प्रचारादरम्यान उमेदवारांना करावयाच्या खर्चासाठी निवडणूक आयोगाने वेगवेगळ्या बाबीचे दर निश्चित करुन दिले आहेत. या निश्चित केलेल्या दरामध्ये आणि प्रत्यक्षातील दरात मोठी तफावत असली तरी आयोगाने दिलेल्या दरसूची जुळविताना उमेदवारांच्या नाकीनऊ येत आहे.नांदेड लोकसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी अरुण डोंगरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रारंभीच राजकीय पक्षांना तसेच इतर इच्छुकांच्या बैठकीत निवडणूक खर्च नोंदीची कार्यवाही करताना २०१९ वर्षासाठीची आयोगाने दिलेली दरसूचीही सुपूर्द केली होती. त्यानुसार राजकीय पक्षाकडून उमेदवारांचा खर्च दाखविला जात आहे.उमेदवारांच्या सभासाठी लागणाऱ्या ध्वनी व्यवस्थेसाठी प्रतिदिन अडीच हजार रुपये तर साध्या टेंटसाठी तीनशे रुपये भाडे निश्चित करण्यात आले आहे. डिजिटल बॅनरचे भावही आयोगाने निश्चित करुन दिले असून ७ रुपये प्रतिस्क्वेअर फूट दराने उमेदवारांना बॅनर लावता येणार आहेत. एक चतुर्थांश आकारातील पत्रकासाठी १०० प्रतीसाठी ३५ ते १२५ दर आकारला जाणार आहे.उमेदवारांच्या प्रचारादरम्यान वापरण्यात येणाºया एलएडी बल्ब आणि ट्युबचा दरही निश्चित करण्यात आला आहे. शंभर वॅटच्या बल्बसाठी ६० रुपये तर ४० वॅटच्या ट्यूबसाठी २५ रुपये निश्चित करण्यात आले आहेत. प्रचारादरम्यान वक्ते, मुख्य नेते यांच्यासाठी वापरण्यात येणाºया आराम खुर्चीसाठी दीडशे रुपये तर टेबलसाठी चाळीस रुपये दर निश्चित केला आहे. इंदिरा गांधी मैदानावर सभा घेण्यासाठी सहा तासाला १५ हजार तर जुना मोंढा मैदानावरील सभेला १० हजार रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने चहा, कॉफीचे दरही ठरविले आहेत. एक कप चहाचा दर सात रुपये तर कॉफीचा दर दहा रुपये, नाश्ता ४५ तर जेवण १३० रुपयांना निश्चित करण्यात आले आहे.राजकीय पक्षांच्या कार्यालयासाठी एक महिन्याचा दरही आयोगाने निश्चित केला असून १५ हजार रुपये प्रतिमाह दर द्यावा लागणार आहे. लहान कार्यालयासाठी हा दर २ हजार ५०० रुपये ठेवण्यात आला आहे.मोठ्या सभांसाठी सुरक्षेच्या दृष्टीने केलेल्या लाकडी बॅरीकेटींगचा खर्चही उमेदवाराच्या खर्चात समाविष्ट केला जाणार आहे. प्रतिमीटर बॅरीकेटींगसाठी १७५ रुपये खर्च मंजूर करता येणार आहे. कारपेटचे दरही निश्चित करण्यात आले असून ग्रिन कारपेट प्रती स्क्वेअरफूट २ रुपये, ज्योते कारपेट १ रुपये आणि साधे कारपेट ३० रुपयांना भेटणार आहे.प्रचारासाठी येणाºया व्हीआयपींच्या निवासाचे दरही निश्चित करण्यात आले आहेत. व्हीआयपी सूट ४ हजार ५००, सेमी व्हीआयपी सूट ३ हजार ५००, एसी सूट २ हजार, नॉन एसी सूट दीड हजार आणि इतर प्रतिव्यक्तीसाठी ३०० रुपये दर निश्चित करण्यात आले आहेत. प्रचारादरम्यान लागणाºया वाहनांचे दरही आयोगाने उमेदवारांपुढे दिले आहेत. जीपसाठी ८ ते १० रुपये तर लक्झरी कारसाठी १२ रुपये प्रतिकिलोमीटर भाडे द्यावे लागणार आहेत. आॅटोरिक्षासाठी ४५० तर मोटारसायकलसाठी २०० रुपये भाडे निश्चित केले आहे.कुलरचे प्रतिदिन भाडे ४५० रुपयेवाढत्या तापमानामुळे प्रचारादरम्यान नेते, कार्यकर्ते घामाघूम होत आहेत. प्रचारातून थोडी उसंत मिळताच कुलर, पंखे, एसीपुढे थांबण्याची संधी ते सोडत नाहीत. कुलरसाठीही आयोगाने प्रतिदिन भाडे निश्चित केले आहे. त्यात ४५० रुपये उमेदवारांना खर्च करण्यात येणार आहे. ७.५ एचपीच्या जनरेटरसाठी १ हजार आणि १२.५ एचपीच्या जनरेटरसाठी दरदिवशी दीड हजार रुपये भाडे उमेदवारांच्या खर्चात समाविष्ट होणार आहे.
खर्चाचे दर जुळविताना उमेदवारांची दमछाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2019 12:41 AM
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये आता रंगत येत असून १८ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानासाठी प्रचारही वेगात सुरु आहे. या प्रचारादरम्यान उमेदवारांना करावयाच्या खर्चासाठी निवडणूक आयोगाने वेगवेगळ्या बाबीचे दर निश्चित करुन दिले आहेत.
ठळक मुद्देखर्चाची पहिली तपासणी शनिवारी होणार