शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
4
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
5
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
6
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
7
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
8
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
9
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
11
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
12
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
13
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
15
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
16
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
17
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
18
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
19
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
20
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी

आक्षेपार्ह विधान प्रकरणी केशव धोंडगेंवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 12:54 AM

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या माजी खासदार केशवराव धोंडगे यांचा बुधवारी जिल्हाभरात आंबेडकरी कार्यकर्त्यांसह विविध संस्था, संघटनांच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. लोहा येथे धोंडगेंच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी कंधार पोलीस ठाण्यात धोंडगे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याबरोबरच धोंडगेविरोधात सुरेश गायकवाड आणि प्रा. राजू सोनसळे यांनी पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या आहेत. तर अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी धोंडगे यांना अटक करण्याची मागणी केली.

ठळक मुद्देलोह्यात प्रतीकात्मक पुतळा जाळलानांदेडात पडसाद, सिडकोतही निदर्शने

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या माजी खासदार केशवराव धोंडगे यांचा बुधवारी जिल्हाभरात आंबेडकरी कार्यकर्त्यांसह विविध संस्था, संघटनांच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. लोहा येथे धोंडगेंच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी कंधार पोलीस ठाण्यात धोंडगे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याबरोबरच धोंडगेविरोधात सुरेश गायकवाड आणि प्रा. राजू सोनसळे यांनी पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या आहेत. तर अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी धोंडगे यांना अटक करण्याची मागणी केली.कंधार येथील लॉ कॉलेजमधील एका कार्यक्रमात बुधवारी धोंडगे यांनी डॉ. आंबेडकरांच्या घटना निर्मितीतील योगदानाबद्दल आक्षेपार्ह विधान केले. हे विधान सोशल मीडियाच्या माध्यमातून पुढे आले. त्यानंतर सर्वच क्षेत्रांतील मान्यवरांनी धोंडगेंच्या वक्तव्याचा निषेध केला. सोशल मीडियावरही धोंडगे यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते सुरेश गायकवाड आणि भारिपचे प्रा. राजू सोनसळे यांनी माजी खा. धोंडगे यांच्यावर घटनाकारांच्या अवमानप्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवमानकारक उद्गार काढणारे माजी खा. केशवराव धोंडगे यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येवून त्यांना अटक करण्याची मागणी अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी केली.यासंदर्भात सदावर्ते यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक (पीसीआर आणि अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट) यांची मुंबईत भेट घेवून त्यांचे धोंडगे यांनी केलेल्या वक्तव्याकडे लक्ष वेधले. यावेळी सदावर्ते म्हणाले, धोंडगे यांना अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टच्या कलम १८ ब खाली अटक व्हायला हवी, पोलिसांनी याप्रकरणात वेळकाढूपणा करु नये. कायद्याचा जोर असावा तसेच धोंडगे यांच्या वक्तव्यावरुन काही घडले तर प्रशासन आणि धोंडगे जबाबदार राहतील, असे सांगितले. त्यावर कैसर खालिद यांनी कारवाई केली जाईल, असा शब्द दिला.लोह्यात चारशे-पाचशे जणांच्या समूहाने तहसीलदार व पोलिसांना कारवाईचे निवेदन दिले. शहराच्या भाजीमंडईत धोंडगे यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. नगरसेवक बबन निर्मले, गंगाधर महाबळे, छत्रपती धूतमल, रत्नाकर महाबळे, एम. आर. कापुरे, हरिभाऊ जोंधळे यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. बुधवारी लोह्याच्या क्रांतिसूर्य बुद्धविहारात आंबेडकरी चळवळीतील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यानंतर पोलीस ठाण्यात नायब तहसीलदार अशोक मोकले व पो.नि.मोहिते यांना निवेदन देण्यात आले.माजी उपनगराध्यक्ष छत्रपती धूतमल, नगरसेवक बबन निर्मले, भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष एस.एन.शिनगारपुतळे, सरचिटणीस रत्नाकर महाबळे, बालाजी खिल्लारे, गंगाधर महाबळे, पंचशील कांबळे, डी.एन.कांबळे, उत्तम महाबळे, भारिपचे अध्यक्ष हरिभाऊ जोंधळे, रिपाइं जिल्हा प्रवक्ते बालाजी धनसडे, सुरेश महाबळे, ज्ञानोबा हनवते, एम. आर. कापुरे सतीश निखाते, शिवराज दाढेल आदींची उपस्थिती होती.धोंडगे यांच्या वक्तव्याचे पडसाद नांदेड शहरातही उमटले. सिडको परिसरात केशव धोंडगे यांच्या वक्तव्याचा निषेध करत कार्यकर्त्यांच्या वतीने निदर्शने केली. धोंडगे यांच्यावर तत्काळ कारवाई करण्याच्या मागणीसाठी रमाई चौकात राजू लांडगे, विठ्ठल गायकवाड, संदीप गायकवाड, जगदीश भुरे, संदीप सोनकांबळे, संजय निळेकर, अनिल बेरजे आदींनी निदर्शने केली. तसेच धोंडगेंच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले.कार्यकर्ते ठिकठिकाणी उतरले रस्त्यावरहा व्हिडीओ सोशल मीडियातून व्हायरल झाल्यानंतर लोहा-कंधार-नांदेड जिल्ह्यातील आंबेडकरी जनतेत संतापाची लाट उसळली. नामांतर लढ्यातील धोंडगे यांचा विरोध सर्वश्रुत होता. त्यात हे आक्षेपार्ह विधान आल्याने आंबेडकरी कार्यकर्त्यांबरोबरच इतरांनीही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. याबरोबरच कार्यकर्ते रस्त्यावरही उतरले.भाई धोंडगे यांचा बिनशर्त माफीनामाकेशव धोंडगे यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा नांदेडसह राज्यभरातील सर्वच स्तरांतून व्यक्त होऊ लागल्यानंतर माजी खा.केशव धोंडगे यांनी आपला माफीनाफा सोशल मीडियावर टाकला. सदर वक्तव्य अनावधानाने निघाले असल्याचे सांगत या वक्तव्याबाबत डॉ. आंबेडकरांच्या चरणी बिनशर्त माफी मागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

टॅग्स :NandedनांदेडCrime Newsगुन्हेगारीagitationआंदोलन