शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूमध्ये बसपा प्रदेशाध्यक्ष आर्मस्ट्राँग यांच्यावर हल्ला, 6 आरोपींनी घरासमोरच केली हत्या
2
"सरकार आणि मनोज जरांगे यांच्यात समन्वय आवश्यक, हा विषय लवकर संपवा"; चव्हाण, भुमरे, जरांगे यांच्यात दोन तास चर्चा
3
मोठी बातमी! अशोक चव्हाण अन् संदिपान भुमरे अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंच्या भेटीला...
4
'सूर्याचा कॅच अन् आम्ही 50 जणांनी 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट', CM शिंदेंची तुफान फटकेबाजी
5
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संघ मुख्यालयात, सरसंघचालकांसोबत चर्चा
6
“मुंबईत १ लाख लोक मावतील एवढे स्टेडियम व्हावे”; फडणवीसांची रोहित शर्मा समोरच मागणी
7
Anant Ambani And Radhika Merchant Wedding : धोनी आणि साक्षीची 'संगीत समारंभा'ला हजेरी, Video
8
Rohit Sharma Suryakumar Yadav, Maharashtra Vidhan Bhavan Felicitation: "तर मी सूर्याला बसवलं असतं.."; विधानभवनात रोहित शर्माची तुफान बॅटिंग, सभागृहात पिकला हशा
9
Belly Fat: 15 दिवसांत आत जाईल बाहेर आलेलं पोट! नॅच्युरोपॅथी तज्ज्ञांनी सांगितला 'रामबाण' घरगुती उपाय
10
“विधान परिषद निवडणुकीत आमचे तिन्ही उमेदवार निवडून येतील, शंखनाद सभा घेणार”: नाना पटोले
11
CM शिंदेंच्या नातवाशी रंगला रोहित शर्माचा लडिवाळ संवाद... पाहा आजच्या कार्यक्रमाचे Photos
12
या पेनी स्टॉकवर LIC सह अनेक बँका 'फिदा'; 17 दिवसांत दुप्पट केला पैसा! किंमत 5 रुपयांपेक्षाही कमी
13
लोकसभा निकालाचा परिणाम की...? भाजपनं अनेक राज्यांत नियुक्त केले नवे प्रभारी
14
टीम इंडियाला महाराष्ट्र सरकारकडून ११ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर; मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
15
"ऑगस्ट महिन्यात कोसळणार मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार’’, इंडिया आघाडीतील बड्या नेत्याचा दावा 
16
Video: 'माझ्याबद्दल खुप वाईट बोललं गेलं, पण मी...' PM मोदींसमोर हार्दिकने मांडल्या वेदना
17
कॅच हातात बसला, आपण आणखी एक वर्ल्डकप जिंकू; सूर्याचे विधानसभेला मराठीतून आश्वासन
18
मुख्यमंत्र्यांची भेट, नंतर प्रकाश आंबेडकरांची वसंत मोरेंवर टीका; म्हणाले तीन विषयांवर चर्चा...
19
“ओबीसी एकत्र आहोत, मनोज जरांगेंच्या पाडापाडीला आमच्या शुभेच्छा”; लक्ष्मण हाकेंचा पलटवार
20
'मुंबईकर' वर्ल्ड चॅम्पियन्स मुख्यमंत्र्यांच्या भेटीला! रोहित, सूर्या, दुबे, यशस्वी यांचा 'वर्षा'वर सत्कार

कार अन् ट्रॅक्टर अपघातात महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या कॅशियरचा मृत्यू, तीन कर्मचारी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 12:47 PM

नांदेड ते लातूर राष्ट्रीय महामार्गावर लांडगेवाडी परिसरात झाला अपघात 

- गोविंद कदम

लोहा: लांडगेवाडी परिसरात नांदेड- महामार्गावर चारचाकी आणि ट्रॅक्टरची शुक्रवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास जोरदार धडक झाली. यात एकाचा मृत्यू झाला असून तिघे जखमी आहेत. प्रशिल सुनिल बागडे (३२ रा.नागपुर ) असे मृताचे नाव आहे. मृत आणि जखमी चौघेही माळाकोळी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेची कर्मचारी असल्याची माहिती आहे. मृत बागडे हे बँकेत कॅशियर होते. 

नांदेड ते लातूर राष्ट्रीय महामार्ग ३६१ वर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा माळाकोळी येथील चार कर्मचारी शुक्रवारी रात्री एका हॉटेलवर जेवणासाठी गेले होते. जेवणानंतर  नांदेडकडे जात असताना रात्री बारा वाजेच्या सुमारास लांडगेवाडी परिसरात त्यांच्या चारचाकीचा ( एम .एच २४ ए.फ.६६१७)  आणि ट्रॅक्टरचा अपघात झाला. 

अपघाताची माहिती मिळताच माळाकोळी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय निलपत्रेवार  यांच्या पथकाने अपघातस्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमींना माळाकोळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून प्रशिल बागडे यास मृत घोषित केले. तर इतर तिघांना प्रथमोपचार करून अधिक उपचारासाठी नांदेड येथील रुग्णालयात रवाना आले.

टॅग्स :AccidentअपघातNandedनांदेड