राठोड सेवानिवृत्त
किनवट - नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सारखणी शाखा व्यवस्थापक सुभाष राठोड सेवानिवृत्त झाल्याने त्यांना एका कार्यक्रमात निरोप देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ठाकूर तर प्रमुख पाहुणे म्हणून बंडू नाईक, हांडरे, विशाल जाधव, बँक मॅनेजर गायकवाड, कॅशिअर माेरे, व्यापारी बाबू जयस्वाल, कुंदन पाटील, पंजाब कांबळे, लक्ष्मण मिसेवार, गोविंद राठोड, डॉ. रामराव राठोड उपस्थित होते. हिरामन शेडमाके यांनी आभार मानले.
कुंटूर ग्रा. पं. बिनविरोध
नायगाव - नायगाव तालुक्यातील कुंटूर ग्रामपंचायत बिनविरोध निवडून आली. विजयी उमेदवारांत रूपेश देशमुख, शिल्पा हनमंते, हणमंत पुठ्ठेवाड, शिवाजी होळकर, आशा कदम, भारतबाई अडकिणे, दत्ता नालीकंठे, सुधाकर झुंजारे, सविता डोके, अख्तरबी शेख, सूर्यकांत कदम, राधाबाई भोसले, नंदाबाई पवार आदींचा समावेश आहे.
कुस्तीचा फड रंगला
मुखेड - तालुक्यातील ईटग्याळ प. दे. येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खंडोबा यात्रा पार पडली. यानिमित्ताने कुस्ती स्पर्धा पार पडली. परिसरातील पहिलवानांनी स्पर्धेत भाग नोंदविला. शनिवारी रात्री खंडोबाजी पालखी व जागरण कार्यक्रम पार पडला. कोरोनामुळे साध्या पद्धतीने यात्रा पार पडली.
चिखलीकरांकडून सांत्वन
लोहा - खा. प्रताप पाटील चिखलीकर यांनी नगरसेवक जीवन चव्हाण यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. चव्हाण यांच्या मातोश्री सत्यभामाबाई चव्हाण यांचे नुकतेच निधन झाले होते. यावेळी माणिकराव मुकदम, नगरसेवक दत्ता वाले, माधव पाटील, राम पाटील, जीवन चव्हाण, श्याम नळगे, विजय चव्हाण उपस्थित होते.
रानडुकराचा हल्ला
हिमायतनगर - तालुक्यातील खडकी बाजार येथील एका महिलेवर रानडुकराने हल्ला केल्याने ती जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. मायाबाई गाडगे या शेतात हरभऱ्याची पाहणी करत असताना दबा धरून बसलेल्या रानडुकराने त्यांच्यावर हल्ला केला. यात मायाबाई जखमी झाल्या. आरडाओरडा केल्याने रानडुकराने पळ काढला. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बांधकाम मजूर जखमी
लोहा - जुना लोहा शहरातील कलाल पेठ येथील बांधकाम मजूर दामोदर धबाले दुचाकीच्या धडकेत जखमी झाले. सोमवारी सायंकाळी तहसील कार्यालयासमोर ही घटना घडली. त्यांना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. एमएच २६ एच ४०२३ असा दुचाकीचा क्रमांक आहे.
तळणी बिनविरोध
बिलोली - बिलोली तालुक्यातील तळणी ग्रामपंचायत बिनविरोध निवडून आली आहे. नरसिंग मोंडेवाड, दिगंबर मुलकेवार, सुशीलाबाई पिलनवाड, गणपत जाधव, सुरेखा घंटेवाड, चंद्राबाई माळवे, राधाबाई बुधवाड, पंडित जाधव, शेख बिस्मिल्लाबी यांची सदस्य म्हणून निवड झाली. गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.