केंद्र सरकारची धोरणे शेतकरी, कामगार विरोधी- अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 02:28 PM2020-10-03T14:28:11+5:302020-10-03T14:29:39+5:30

भाजप सरकार  उद्योगपती धार्जिणे आहेत. त्यांना देशातील शेतकरी, कामगार व सर्वसामान्यांविषयी कसलाही जिव्हाळा नाही. केंद्राच्या नव्या विधेयकामुळे  देशातील वंचित घटक देशोधडीला लागेल, असा आरोप काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केला.

Central Government Policies Farmers, Anti-Workers - Ashok Chavan | केंद्र सरकारची धोरणे शेतकरी, कामगार विरोधी- अशोक चव्हाण

केंद्र सरकारची धोरणे शेतकरी, कामगार विरोधी- अशोक चव्हाण

Next

नांदेड: केंद्रातील भाजप सरकारची धोरणे शेतकरी कामगारविरोधी असल्याचा आरोप करीत शुक्रवारीकाँग्रेस रस्त्यावर उतरली. भाजप सरकार  उद्योगपती धार्जिणे आहेत. त्यांना देशातील शेतकरी, कामगार व सर्वसामान्यांविषयी कसलाही जिव्हाळा नाही. केंद्राच्या नव्या विधेयकामुळे  देशातील वंचित घटक देशोधडीला लागेल, असा आरोप काँग्रेस नेतेअशोक चव्हाण यांनी केला.

पालकमंत्री अशोक चव्हाण, माजी खा. तुकाराम रेंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली बैलगाडी  लाँगमार्च काढण्यात आला. शहरातील रेल्वे स्थानक  परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून बैलगाडी लाँगमार्चला प्रारंभ झाला. पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर हा मोर्चा छत्रपती  शिवाजी  महाराज यांच्या पुतळ्याजवळ पोहोचला. 

यावेळी झालेल्या जाहीर सभेत पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी मोदी सरकारच्या कृषी धोरणावर सडकून टीका केली. शेतकरी विधेयकामुळे देशातील  शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होणार असून केवळ उद्योगपतींना  फायदा पोहोचविण्यासाठी सरकार अशा पद्धतीचे कायदे  करीत असल्याचा आरोप  चव्हाण यांनी केला.

परभणीचे माजी खा. तुकाराम रेंगे पाटील म्हणाले की, सरकारने ज्या पद्धतीने शेतकरी विधेयक पारित केले आहे, ही पद्धत हुकुमशाहीकडे जाणारी आहे.  या विरोधात सर्वच घटकांनी रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारावा. आ. अमरनाथ राजूरकर, आ. मोहन हंबर्डे, आ. रावसाहेब अंतापूरकर, जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, महापौर मोहिनी येवनकर यांच्यासह हजारो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. 

 

Web Title: Central Government Policies Farmers, Anti-Workers - Ashok Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.