चौकट- दहावीचा अभ्यासक्रम - यंदाचे वर्ष हे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने विस्कळीत असले तरी या आव्हानांना सामोरे जाण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळत आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांचा २५ टक्के अभ्यासक्रम कमी केल्यामुळे व परीक्षेला एक ते दीड महिना लांबणीवर टाकल्यामुळे विद्यार्थ्यांना चांगले मार्क घेण्याची संधी आहे.अनेक शाळांनी ५० टक्के ऑनलाईन अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. आता प्रत्यक्ष शिकवणीद्वारे ते पूर्ण होऊ शकतो. तसेच सराव परीक्षाही घेण्यात वेळ आहे. - प्रा. गणपत शिराळे, शिक्षणतज्ज्ञ,नांदेड
चौकट- बारावीचा अभ्यासक्रम - बारावीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवल्यामुळे त्यांचे नुकसान होणार नाही. अभ्यासातील २५ टक्के भाग वगळल्यामुळे विद्यार्थ्यांना उर्वरित अभ्यासासाठी वेळ उपलब्ध आहे. आता महाविद्यालये सुरू झाली असून विज्ञान व कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येणार नाही. - प्रा. पी. के. जाधव, शिक्षणतज्ज्ञ, नांदेड.
प्राचार्य कोट- बारावीच्या विद्यार्थ्यांचा ७५ टक्के अभ्यासक्रम ऑनलाईन पूर्ण केला आहे. त्यानंतर आता महाविद्यालये सुरू झाल्यानंतर विद्यार्थी आपल्या अडचणी घेऊन येत आहेत. त्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या दृष्टीने अडचण नाही. जे विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून दूर होते, अशा काही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. - प्राचार्य पौळ, श्री शिवाजी महाविद्यालय, नांदेड
मुख्याध्यापक कोट- दहावीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण पूर्ण केले असले तरी आमच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांना अभ्यासक्रमातील अडचणी दूर केल्या आहेत. तसेच इंग्रजी, गणिताचे वाढीव तास घेऊन विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली आहे. - तुकाराम गाडेकर, राष्ट्रमाता उर्दू विद्यालय, वाजेगाव, ता. नांदेड.
प्रतिक्रिया - ऑनलाईनद्वारे दिलेल्या सूचना व मार्गदर्शनानुसार दहावीचा अभ्यास सुरू केला; मात्र खूप गोंधळल्यासारखे वाटत होते. मात्र हळूहळू सवय होत गेली. आता सवय झाली आहे. - आशिष सारकी, दहावी, विद्यार्थी, नांदेड.
प्रतिक्रिया - बारावीचे वर्ष असल्याने थोडी भीती होती. मात्र ऑनलाईन शिक्षणाची मदत घेऊन सुरुवातीला अभ्यासक्रमाची ओळख करून घेतली. प्रत्यक्ष शिकवणीत जे समाधान होते. ते ऑनलाईन शिकवणीद्वारे होत नाही. त्यामुळे अभ्यासात अडचणी आल्या. - मोहन कवटगी, बारावी विद्यार्थी, नांदेड.