बिलोली तालुक्यातील कासराळी येथील निवडणुकीचा प्रचार सद्या येथे शिगेला पोहोचला . माञ येथील मागील निवडणुकांची पार्श्वभूमी पाहता येथे माजी आ.गंगाराम ठक्करवाड आणि विरोधक अशीच येथे निवडणूक आजपर्यंत झाली. मागील दोन पंचवार्षिक निवडणुकीत येथे ठक्करवाड विरोधक आणि काँग्रेस समर्थकांना यश मिळाले माञ ते सत्तेला पुरक नव्हते .ग्रामपंचायतीत ५, २ अशी दोन पंचवार्षिक मध्ये यश मिळाले.माञ सरपंच काही होता आले नाही. सत्ता ठक्करवाड यांच्याच ताब्यात राहिली.त्यावेळी माजी जि.प.सदस्य संग्राम हायगले , नरेंद्रसिंह ठाकुर , गंगाराम चरकुलवार , सेवानिवृत तलाठी दत्ताञय गंदमवाड आदी मंडळी तत्कालीन ठक्करवाड विरोधक म्हणुन ओळखली जायची माञ अपेक्षित यशाअभावी ही मंडळी आज निवडणुकीपासुन लांब असल्याने यंदाच्या निवडणुकीत मात्र ही बाजू युवकांनी सांभाळली आहे.येथे ठक्करवाड यांच्याविरोधात अल्पसंख्यांक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष माजीद शेख , शिवा पाटील कासराळीकर , शिवा जाकापुरे , शिवाजी शिंदे , पं.स. सदस्य प्रतिनिधी हानमंत इंगळे , दिपक संदलोड , पप्पु फुलारी यांनी सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी एल.एच. लंके यांना सोबत घेत स्वतंत्र पॕॅनल उभे केले. प्रारंभी येथे ठक्करवाड गटांकडुन अनेकांनी निवडणूक लढवण्याचे निश्चित केले होते. मात्र मर्जीतील लोकांना ऊमेदवारी मिळाल्याने अनेकांचा भ्रमनिरास झाला. अनुसुचित जाती घटकातील इच्छुकांचे बंड पंचायत समिती तिकीटाच्या अमिषाने मोडीत निघाले. वास्तविक सद्या कासराळी पं.स. गणच अनुसुचित जातीसाठी राखीव आहे. आणि चक्रानुक्रम आरक्षण असल्याने २० वर्षापर्यंत हे गण या प्रवर्गासाठी राखीव राहील याची सुतराम शक्यता नसतांना ह्या तिकीटाचे गाजर दाखवून बंड करणा-यांना गंडविण्यात आले.. सद्या येथे प्रचाराने वेग घेतला असुन ठक्करवाड यांच्यासमोर तोडीस तोड उमेदवार दिले. सक्षमपणे प्रचार यंत्रणा राबवुन या नवख्या युवकांनी ठक्करवाड यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे.
कासराळीत युवक निर्मित नवख्या पॕनलचे ठक्करवाडांसमोर आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2021 4:14 AM