पदवी अभ्यासक्रमातील प्रथम वर्ष (पहिले व दुसरे सत्र) हे पूर्वीच्या वेळापत्रकानुसार २३ ते ३१ मार्च असे होते. ते आता सुधारित वेळापत्रकानुसार १ ते १२ एप्रिल दरम्यान होणार आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रम व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमातील प्रथम वर्ष (पहिले व दुसरे सत्र) पूर्वीच्या वेळापत्रकानुसार १ ते १० एप्रिल असे होते. ते आता सुधारित वेळापत्रकानुसार १० ते २० एप्रिल असे आहे. औषधनिर्माणशास्त्र, अभियांत्रिकी, विधी, बी.एड.एम.एड., एम.बी.ए., एम.पी.एड. इत्यादी प्रथम वर्ष अभ्यासक्रमातील (पहिले व दुसरे सत्र) पूर्वीच्या वेळापत्रकानुसार १० ते २० एप्रिल असे होते. ते आता सुधारित वेळापत्रकानुसार २० ते ३० एप्रिल दरम्यान होणार आहेत. बीसीए व बीसीएस अभ्यासक्रमातील प्रथम वर्ष (पहिले व दुसरे सत्र) पूर्वीच्या वेळापत्रकानुसार १ ते १० एप्रिल असे होते. ते आता सुधारित वेळापत्रकानुसार १ ते १२ एप्रिल या दरम्यान घेण्यात येणार आहेत. या बदलाची नोंद सर्व विद्यार्थी व सबंधितांनी घ्यावी असे विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवी सरोदे यांनी कळविलेले आहे.
महाविद्यालयीन स्तरावरील क्लस्टर परीक्षेच्या वेळापत्रकात बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 4:17 AM