नांदेड : लोकसभा निवडणुकीत नांदेड मतदारसंघात १८ एप्रिल रोजी मतदान होत आहे. काँग्रेसचे उमेदवार अशोकराव चव्हाण यांच्या प्रचारासाठी अख्खे चव्हाण कुटुंब मतदारसंघात प्रचार करीत आहे़काँग्रेस महाआघाडीची उमेदवारी खा. अशोक चव्हाण यांना मिळाली़ दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या मतदानासाठी प्रचार आता शिगेला पोहोचला आहे़ खुद्द प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे संपूर्ण जिल्हा पादाक्रांत करीत आहेत. त्याचवेळी त्यांच्या पत्नी आ. अमिता चव्हाण, मुली श्रीजया व सुजया आणि पुतणे नरेंद्र चव्हाण यांनीही अशोकरावांच्या प्रचारासाठी अनेक सभा घेतल्या आहेत. सकाळी १० ते रात्री दहापर्यंत अविश्रांत प्रचार सुरू आहे़अशोकराव चव्हाण । काँग्रेस४० वर्षापासून राजकारणात असलेले अशोकराव चव्हाण हे राज्याची धुरा सांभाळत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पदही आज त्यांच्याकडे आहे. दोन वेळा मुख्यमंत्रीपदासह विविध मंत्रीपदेही त्यांनी भुषविली आहेत.पत्नी । अमिता चव्हाणखा. अशोकराव चव्हाण यांच्या सुविद्य पत्नी या भोकर विधानसभा मतदार संघाच्या आमदार आहेत. प्रचारात भोकर मतदार संघासह नांदेड शहराची धुराही त्यांच्याकडे आहे.मुलगी । श्रीजया, सुजयाप्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या दोन कन्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पहिल्यांदाच उतरल्या आहेत. राजकारणात कोणतेही पद नसले तरीही आजोबा, आई-वडीलांच्या अनुभवाच्या जोरावर त्या प्रचार करीत आहेत.पुतण्या। नरेंद्र चव्हाणनांदेड लोकसभा मतदार संघात अशोक चव्हाण यांचे पुतणे नरेंद्र चव्हाण हेही प्रचारात उतरले आहेत. नांदेडच्या राजकारणात तीन वर्षापासून कार्यरत आहेत. नांदेड दक्षिण मतदार संघाची जबाबदारी त्यांच्याकडे दिली.
अवघे चव्हाण कुटुंबिय उतरलेय निवडणूक प्रचारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2019 12:01 AM
लोकसभा निवडणुकीत नांदेड मतदारसंघात १८ एप्रिल रोजी मतदान होत आहे. काँग्रेसचे उमेदवार अशोकराव चव्हाण यांच्या प्रचारासाठी अख्खे चव्हाण कुटुंब मतदारसंघात प्रचार करीत आहे़
ठळक मुद्देराजकीय आखाडा जिंकण्यासाठी सारेच करताहेत मेहनत