बारड- येथील जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळेत जाणता राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार
अर्पण करण्यात आला. यावेळी नरसिंग आठवले, मु.अ.संजय माहूरकर, शिक्षक दिगंबर कदम,संतोष देशमुख शिक्षिका शिवांगी वानखेडे,प्रेमिला पिठाडीया,पदमीन येरावार,उषा हाळे,चंद्रकला आठवले, खंडू बटलवार उपस्थित होते.
तोरणा येथे जयंती साजरी
बिलोली- तालुक्यातील तोरणा येथे शिव जन्मोत्सव साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन राज्य प्रतिष्ठानचे महाराष्ट्र अध्यक्ष विकास महाराज भेगडे, मच्छिंद्र महाराज धानीपकर, ग्रा. पं. सदस्य प्रतिनिधी सखाराम गुरुजी नरवाडे, लक्ष्मण बोरगावे, अवधूत हिवराळे, धर्मगिरी महाराज यांच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आले .
मुदखेड काँग्रेस कमिटी कार्यालय
बारड : मुदखेड येथील काँग्रेस कमेठी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले
यावेळी काँग्रेस तालुका अध्यक्ष उद्धवराव पवार, काँग्रेस शहर अध्यक्ष माधव पाटील कदम, नगरसेवक चांदू चमकुरे, चांदू बोकेफोड, इमरान शेठ, संचालक संदीप गाढे, मनीष शेवटे, तालुका सरचिटणीस रामराव खांडरे, महाराष्ट्र सोशल मीडिया सरचिटणीस कपिल लोखंडे, सचिन चंद्रे, पिंटू ठाकूर आदी उपस्थित होते.
फुलवळ येथे जयंती साजरी
फुलवळ- जि.प. के. प्रा. शाळा फुलवळ येथे संरपच,उपसंरपच,माजी सरपंच,अध्यक्ष,ग्रा.पं.सदस्य,सामाजिक कार्यकर्ता,व मु.अ.सह सर्व शिक्षक शिक्षिका आदींनी शिवजयंती साजरी करुन मानाचा मुजरा केला.
उमरीत जयंती साजरी
उमरी : स्वराज्य संस्थापक , कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उमरी शहरात उत्साहात साजरी करण्यात आली.
येथील मोंढा मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त उद्योजक मारोतराव कवळे गुरुजी यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी भारतीय सैन्य दलातील निवृत्त सैनिक आनंदराव वडजे , काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते गणेशराव पाटील कौडगावकर , संदीप पाटील कवळे , शिवसेना तालुकाप्रमुख सुभाष पेरेवार, नगरसेवक रतन खंदारे, विजय चव्हाण , अतुल आचकुलवार , शेख बबलू , कृष्णा गोकावार , आशिष मुदीराज, शिवा पांचाळ आदींची उपस्थिती होती. तत्पूर्वी शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला शहरातील मोंढा मैदानावर नियोजित छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या ठिकाणी दिव्यांची रोषणाई व फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी माजी प्राचार्य ए. एस. जाधव, संदीप पाटील कवळे , श्याम लाभसेटवार, माजी नगरसेवक शिवाजी शिंदे , छावाचे तालुकाध्यक्ष राजेश जाधव , गोविंद ढगे , छावाचे बालाजी ढगे , विजय चव्हाण, गजानन अलसटवार ,संतोष पसनूरवार , विजय खांडरे , नगरसेवक रतन खंदारे आनंद चव्हाण , शरद मदनवाड , अमित उत्तरवार , नागेश पडोळे , साईनाथ मठपती , मंगेश माहुरे , योगेश मोरे , कृष्णा गोकावार , शिवा पांचाळ आदींसह असंख्य शिवप्रेमी नागरिक , तरुण यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते.