शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
3
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
4
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
5
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
6
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
7
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
8
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
9
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
10
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
11
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
12
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
13
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
14
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता
15
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
16
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
17
...यासाठी बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाहीत; संजय राऊत भडकले
18
आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार!
19
शुक्राचा गुरु राशीत प्रवेश: १० राशींवर धनलक्ष्मी कृपा, अचानक धनलाभाचे योग; शुभ-लाभाचा काळ!
20
Devayani Farande : मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा

अंगणवाडीत शिजवलेल्या मटकीत किडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 12:20 AM

मुदखेड तालुक्यातील बारड सर्कलमधील जवळा मुरार ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या अंगणवाडी केंद्रात शिजवलेल्या मटकीत भोंगे किडे आढळून आल्याचा प्रकार शुक्रवारी ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला़

ठळक मुद्देमुदखेड तालुक्यातील जवळामुरार येथील प्रकार ग्रामस्थांच्या सतर्कतेने उघडकीस आली घटना ग्रामस्थांसमोर पंचनामा

बारड : मुदखेड तालुक्यातील बारड सर्कलमधील जवळा मुरार ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या अंगणवाडी केंद्रात शिजवलेल्या मटकीत भोंगे किडे आढळून आल्याचा प्रकार शुक्रवारी ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला़ घटनेची माहिती मिळताच प्रभारी बालविकास अधिकारी मारोती जाधव यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला़अंगणवाडी केंद्रातील मुलांना खाण्यासाठी म्हणून मटकी दिली जाते़ नेहमीप्रमाणे आजही मटकी देण्यात आली होती़ मात्र मटकी पाहताच मुलांना धक्काच बसला़ शिजवलेल्या मटकीत भोंगे किडे आढळून आले़ हा प्रकार लक्षात आल्यावर गावातील महिलांनी अंगणवाडी केंद्र गाठून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना जाब विचारला़ तुम्ही आमच्या मुलांना किडे असलेला खाऊ खाऊ घालता का? असा सवाल करत प्रश्नांची सरबत्ती केली़ यावर अंगणवाडी सेविका व मदतनीस दोघेही निरुत्तर झाले़ अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी उलटसुलट उत्तरे देवून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला़ महिलांनी ही बाब गावकऱ्यांना सांगितली़ गावकºयांनी मुदखेडचे गटविकास अधिकारी चंद्रकांत जगताप यांच्याशी संपर्क साधून घडलेला सर्व प्रकार त्यांच्या कानावर घातला़ जगताप यांच्या सूचनेनुसार प्रभारी बालविकास अधिकारी मारोती जाधव, ग्रामविकास अधिकारी रेगुलवार यांनी घटनास्थळी भेट दिली़यावेळी उपस्थित महिलांनी मटकीतील किडे दाखवून रेगुलवार यांच्यावरही प्रश्नांची सरबत्ती केली़ नंतर त्यांनी पंचनामा केला़अंगणवाडीसेविका, मदतनीसला नोटीसमुदखेडचे प्रभारी बालविकास अधिकारी मारोती जाधव, ग्रामविकास अधिकारी रेगुलवार यांनी अंगणवाडी गाठून गावक-यांसमोरच पंचनामा केला़यावेळी त्यांनी किडे असलेला खाऊ का शिजविला? शिजवलेला तो खाऊ बालकांना का दिला? असा जाब अंगणवाडी सेविका व मदतनिसांना विचारला़एकूणच झालेला प्रकार अक्षम्य निष्काळजीपणाने झाल्याचे सांगून जाधव व रेगुलवार यांनी या घटनेला अंगणवाडी सेविका व मदतनीसला जबाबदार धरून त्यांना नोटीस बजावली़काही बालकांनी मटकी खाल्ली होती़ मात्र त्यांना काहीही झाले नाही़ कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही़

माझ्याकडे धर्माबादचाही पदभार आहे़ जवळामुरार येथील प्रकाराबाबत माहिती मिळताच पंचनामा करण्यासाठी बालविकास अधिकारी, सुपरवायझर यांना घटनास्थळाकडे रवाना होण्याच्या सूचना मी केल्या होत्या -चंद्रप्रकाश जगताप, बीडीओ, मुदखेडअंगणवाडी केंद्रांतर्गत शिक्षण घेणा-या लेकरांना निकृृष्ट दर्जाचा खाऊ दिला जातो़ हा प्रकार आरोग्यासाठी हानीकारक आहे -संतोष लखे, आनंदा नागरे, संतोष लोखंडे, रा़ जवळामुरार

टॅग्स :NandedनांदेडEducationशिक्षण