शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'होय मी रस्त्यानेच आलो, रस्त्यानेच जातोय, 'कोकण दरोडेखोरांच्या हातात द्यायचं का?' उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना डिवचले
2
“भाजपा-RSS ने देशासाठी बलिदान दिले नाही, संविधान संपवायचे काम केले”: मल्लिकार्जुन खरगे
3
शरद पवार, मराठा कार्ड; छगन भुजबळांच्या येवल्यात राजकीय समीकरणं काय?
4
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांच्या कन्येचा विवाहसोहळा; दोन राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री उपस्थित
5
लग्नाचं वय १८ वरून ९ वर्ष करण्याचा विचार; महिलांचा विरोध पण इराक सरकारचा तर्क भलताच
6
पुतण्यानेच केली काका, काकू आणि ३ भावंडांची हत्या; १९९७ मधील 'त्या' घटनेचा घेतला बदला
7
"माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद, हे माझा काय मुकाबला करणार", अब्दुल सत्तारांचे विधान
8
“देवेंद्र फडणवीसांची क्षमता पाहा, भाजपाला मतदान करु पण तुतारीला नाही”: लक्ष्मण हाके
9
"...तेव्हा 'मातोश्री'वर राज ठाकरेंनी केलेले फोन उचलले नाहीत; कुठे होता कुटुंबप्रमुख?"
10
“फडणवीसांनी माझे नाव घेऊ नये, मनोज जरांगेंचे घ्यावे, मराठा आरक्षणावर बोलावे”; ओवेसींचे आव्हान
11
इंदिरा गांधी स्वर्गातून खाली उतरल्या तरी कलम 370 परत येणार नाही, अमित शाहांची गर्जना
12
१७ नोव्हेंबरला छत्रपती शिवाजी पार्कवर घुमणार 'राज'गर्जना; मनसेला मिळाली परवानगी
13
अनिल अंबानींच्या कंपनीला ₹२८७८ कोटींचा नफा; यापूर्वी तोट्यात होती कंपनी; ₹३६ वर आला शेअर
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: शिराळ्यामध्ये निष्ठावंत गटांची सत्त्वपरीक्षा
15
नितीश कुमार पायाला स्पर्श करण्यासाठी वाकले, पंतप्रधान मोदी तत्काळ खुर्चीवरून उठले अन्...; सभेचा VIDEO व्हायरल
16
'पवारांनी शिवसेना फोडली'; छगन भुजबळांच्या आरोपावर शरद पवारांनी सोडलं मौन, काय दिलं उत्तर?
17
झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यात दुपारी १ वाजेपर्यंत ४६ टक्के मतदान; धोनीनेही साक्षीसह हक्क बजावला 
18
जम्मू-काश्मीरमध्ये किती दहशतवादी आहेत? यात पाकिस्तानी आणि स्थानिक किती? मोठा खुलासा समोर
19
नवा फ्रॉड! सेल्फीच्या नादात तुमचं बँक अकाऊंट होऊ शकतं रिकामं; हॅकर्स रचतात 'असा' कट
20
५०% घसरू शकते Zomato ची शेअर प्राईज; ब्रोकरेजनं दिलं ₹१३० चं टार्गेट, अंडरपरफॉर्म रेटिंगही कायम

प्रचंड तफावती असणारे मुख्यमंत्र्यांचे पंधरा पानी पत्र हे निव्वळ धूळफेक : संभाजी राजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 2:47 PM

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या विषयावर नांदेडात शुक्रवारी सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यासमोर मूक आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देछत्रपती संभाजी राजे भोसले यांची टिकाअन्यथा लाँग मार्च काढावा लागले

नांदेड- नांदेडच्या आंदोलनापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thakarey ) यांनी मेलवरुन मला पंधरा पानी पत्र पाठविले. पंरतु या पत्रात मोठ्या प्रमाणात तफावती आहेत. त्यामुळे हे पत्र म्हणजे निव्वळ धूळफेक आहे. बर पत्र द्यायचेच होते तर नांदेडचे पालकमंत्री आणि आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण ( Ashok Chavhan ) यांच्या हस्ते का दिले नाही? चव्हाणही आजच्या आंदोलनात कुठे दिसत नाहीत का? असा सवालही छत्रपती संभाजीराजे भोसले ( Sambhaji Raje ) यांनी केला.

मराठा आरक्षणाच्या ( Maratha Reservation ) विषयावर नांदेडात शुक्रवारी सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यासमोर मूक आंदोलन करण्यात आले. यावेळी छत्रपती संभाजी राजे बोलत होते. ते म्हणाले, यापूर्वी कोल्हापूर, नाशिक येथे आंदोलने झाली. त्या ठिकाणी सर्वच पक्षाचे लोकप्रतिनिधी संभाजीराजेंच्या मांडीला मांडी लावून जमिनीवर बसले होते. पत्र पाठवायचेच होते तर त्यावेळी का नाही पाठविले. आज नांदेडात मोर्चा म्हणून पाठविले काय? पाठविलेल्या पत्रातही अनेक तफावती आहेत. त्यामुळे यातून प्रामाणिकपणा दिसून येत नाही. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे की मराठा समाज हा आर्थिक, सामाजिक दृष्टया मागासलेला नाही. मग आरक्षण कसे मिळेल? त्यासाठी राज्याने अगोदर मराठा समाज हा आर्थिक, सामाजिक दृष्ट्या मागासलेला आहे हे सिद्ध करावे आणि केंद्राने पन्नास टक्यावरील आरक्षणाचे बघून घ्यावे. केवळ राज्य आणि केंद्राने एकमेकांवर ढकलाढकली करु नये. दुर्गम आणि डोंगराळ भागाचा मुद्दा घटना दुरुस्ती करुन वगळण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली. 

अन्यथा लाँग मार्च काढावा लागलेमराठा समाजाच्या मागण्या पूर्ण न केल्यास येत्या काळात मुंबई, दिल्ली येथे लाँग मार्च काढावा लागले असा इशाराही संभाजी राजेंनी दिला. यावेळी भाजपाचे खा.प्रताप पाटील चिखलीकर, सेनेचे खा.हेमंत पाटील, आ.राम पाटील रातोळीकर, आ.तुषार राठोड, काँग्रेसचे आ.मोहन हंबर्डे, सेनेचे आ.बालाजी कल्याणकर, आ.शामसुंदर शिंदे, आ.माधवराव पाटील जवळगावकर यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीMaratha Reservationमराठा आरक्षणNandedनांदेड